विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी येण्याऐवजी वेणुगोपाल मातोश्री वर आले आणि उद्धव यांनाच सोनिया दरबारी हजेरी लावण्याचे निमंत्रण देऊन गेले!! हे काल रात्री मुंबईत घडले आहे. Rahul Gandhi didn’t turn up to matoshree instead venugopal came and invited Uddhav Thackeray to meet Sonia Gandhi in Delhi
काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल हे काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना भेटले. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांनाच आपण दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेण्याचे निमंत्रण देत आहोत. त्यावेळी राहुल गांधींची पण त्यांची भेट होईल. त्यानंतर राहुल गांधी मुंबईत येतील, असे वेणुगोपाल म्हणाले.
वेणुगोपाल यांनी आपल्या मातोश्री भेटीतील निमंत्रणातून एकच संदेश दिला, तो म्हणजे काँग्रेस हायकमांड म्हणजेच सोनिया आणि राहुल गांधी कधी कोणत्या प्रादेशिक नेत्यांच्या घरी जात नाहीत, तर त्या प्रादेशिक नेत्यांनाच आपल्या दरबारी बोलवून घेतात!!
मुंबई: AICC महासचिव केसी वेणुगोपाल ने मातोश्री में उद्धव ठाकरे से मुलाकात की। इस दौरान शिवसेना (उद्धव गुट) के नेता संजय राउत, कांग्रेस के वरिष्ठ नेता बालासाहेब थोराट और भाई जगताप भी मौजूद रहे। pic.twitter.com/CG2JKAVAqc — ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
मुंबई: AICC महासचिव केसी वेणुगोपाल ने मातोश्री में उद्धव ठाकरे से मुलाकात की। इस दौरान शिवसेना (उद्धव गुट) के नेता संजय राउत, कांग्रेस के वरिष्ठ नेता बालासाहेब थोराट और भाई जगताप भी मौजूद रहे। pic.twitter.com/CG2JKAVAqc
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या यांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या शुभेच्छा त्यांना दम भरला होता. त्यानंतर शरद पवारांनी देखील निमआक्रमक भूमिका घेत राहुल गांधींना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या 18 पक्षांच्या बैठकीत बॅकफूटवर ढकलले होते. त्यानंतर विरोधी ऐक्यासाठी बैठकांचा सिलसिला दिल्लीत सुरू झाला होता. या बैठकांमध्येच एक बैठक नितेश कुमार मल्लिकार्जुन खर्गे, वेणूगोपाल आणि राहुल गांधी यांच्यात झाली होती. त्यानंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी फोन करून शरद पवार यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलवून घेतले होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीत विरोधी ऐक्यावर या सगळ्यांनी चर्चा केली होती. त्यावेळी पवारांनी राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याची सूचना केली होती. त्यानंतर शरद पवारांच्या सूचनेनुसार राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. यातून मराठी माध्यमांनी पवार नॅरेटिव्ह चालविला होता.
परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. राहुल गांधी मातोश्रीवर आलेच नाहीत. त्यांनी त्यांच्या ऐवजी के. सी. वेणूगोपाल यांना मातोश्रीवर पाठवून त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींना दिल्लीतून भेटण्याचा निरोप दिला. हा निरोप वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचविला आहे. याचीच माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परंतु त्या पत्रकार परिषदेत सावरकरांचा मुद्दा हा प्रश्न पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी वेणुगोपालने उद्धव ठाकरे दोघेही उठले आणि प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारधारा आहे असे सांगून मोकळे झाले.
पण एकूण या सगळ्या भेटीचा अर्थ हाच ठरला की राहुल गांधी मातोश्रीवर आले नाहीत. त्यांच्या ऐवजी वेणूगोपाल आले आणि उद्धव ठाकरे यांना सोनिया दरबारी हजेरी लावण्याचे निमंत्रण देऊन निघून गेले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App