विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी दिल्लीतून नांदेडला येत तेलंगणात प्रचारासाठी रवाना पण प्रकाश आंबेडकर यांच्या संविधान रॅलीसाठी फक्त पत्राद्वारे शुभेच्छा!!, असे आज घडले. Rahul Gandhi came to Nanded from Delhi to campaign in Telangana
प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर संविधान रॅली घेत आहेत. या संविधान रॅलीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना निमंत्रण पाठविले होते. त्या निमंत्रणाचा राहुल गांधींनी स्वीकार जरूर केला, पण ते संविधान रॅलीसाठी प्रत्यक्षात आले नाहीत. त्याऐवजी त्यांनी तेलंगणात काँग्रेसच्या प्रचाराला जाण्यास जास्त पसंती दिली. तेलंगणात जाण्यासाठी राहुल गांधी दिल्लीतून महाराष्ट्रात आले. ते नांदेड विमानतळावर उतरले. तेथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासह राहुल गांधी हेलिकॉप्टरने बोधन मतदारसंघाकडे रवाना झाले.
दरम्यानच्या काळात राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांचे संविधान रॅलीचे निमंत्रण स्वीकारून आपण संविधान रॅलीला येऊ शकत नसल्याचे पत्र पाठविले. मात्र या पत्राद्वारे त्यांनी संविधान रॅलीला शुभेच्छा दिल्या. गेल्या 9 वर्षांपासून राज्यघटनेतल्या मूलभूत तत्वांवर हल्ले सुरू आहेत. राज्यघटना वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संविधान रॅलीचे निमंत्रण मिळाले. परंतु, सध्या निवडणूक प्रचारात गुंतल्यामुळे या रॅलीला येऊ शकत नाही, पण संविधान रॅलीला आणि वंचित बहुजन आघाडीच्या पुढच्या वाटचालीला आपल्या शुभेच्छा आहेत, असे राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App