विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच चांगला चर्चेत आला आहे. 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या बीकेसी मध्ये होणाऱ्या सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची ही सभा होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीए कडे आपला आक्षेप नोंदवला असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या या आक्षेपामुळे काँग्रेसदेखील आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारीदेखील जोरदार सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीकेसी मध्ये त्यांची सभा होणार आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्या आधीच त्यांची ही सभा वादात सापडली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने या सभेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र, आता यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेवर काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ramgiri Maharaj : मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यनंतर रामगिरी महाराजांविरोधात 5 गुन्हे दाखल; संभाजीनगर-नगरमध्ये जमाव आक्रमक
आक्षेप काय घेतला?
राहुल गांधी यांची बीकेसीमध्ये 20 ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. मात्र सायन रेल्वे स्थानक रोडवरी ब्रिज बंद झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक बीकेसी मधून जात आहे. त्यामुळे आधीच बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. वास्तविक सायन रेल्वे स्थानकावरील रोडवरील ब्रिजचे काम सुरू असून येथे नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल पाडण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा झाली तर मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी येथील सभेवर आक्षेप नोंदवला आहेत. बीकेसी परिसरात मेट्रोचे काम देखील सुरू आहे. या कामामुळे पूर्वीपेक्षा रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे. याचाही परिणाम या सभेवर होऊ शकतो, असा मुंबई वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App