विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग, पंजाबमधील आपच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार राघव चढ्ढा, आयआयटीचे प्रा. डॉ. संदीप पाठक, संजीव अरोरा व अशोक मित्तल यांना आप राज्यसभेत पाठविणार आहे. ३३ वर्षीय चढ्ढा यांना या वरिष्ठांच्या सभागृहाच्या इतिहासातील सर्वांत तरुण खासदार बनण्याचा मान मिळणार आहे.Raghav Chadha will be the youngest MP in Rajya Sabha
११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत आपने ९२ जागा जिंकून विजय मिळविला आहे. या राज्यातील ७ खासदारांचा कार्यकाळ येत्या ४ महिन्यांत संपणार आहे. ९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात प्रतापसिंग बाजवा, एस.एस डुल्लो, श्वेत मलिक व शिरोमणी अकाली दलाचे नरेश गुजराल व एस एस ढींढसा तर ४ जुलै रोजी निवृत्त होणाऱ्या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्या अंबिका सोनी व अकाली दलाचे बलविंदरसिंग भुंदर यांचा समावेश आहे. या ७ पैकी एकही सदस्य पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही.
ढिंढसा यांनी अकाली दल सोडून भाजपशी आघाडी केल्याने भाजपला त्यांना बक्षीस द्यायचेच असेल तर दुसºया राज्यातून राज्यसभेवर आणावे लागेल. चढ्ढा व पाठक हे आपच्या ह्यरणनीतीकार’ टीमचे महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. पेशाने चार्टर्ड अकौटंट असलेले चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत.
चढ्ढा यांनी अगदी तरुणवयात दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते आपचे राष्ट्रीय प्रवक्ते बनले. केजरीवाल यांनी त्यांच्यावर पंजाबची जबाबदारी सोपविल्यावर चढ्ढा यांनी गेली ३ वर्षे पंजाबात तळ ठोकला व बूथ पातळीपासून आपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉ. पाठक यांच्यावरही केजरीवाल यांनी चढ्डा यांच्या बरोबरीने पंजाबची जबाबदारी दिली होती. गेली ३ वर्षे तेही पंजाबमध्येच होते. मूळचे छत्तीसगडचे असलेले डॉ. पाठक मूळचे छत्तीसगडच्या मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी केंब्रीजमधून उच्चशिक्षण घेतले आहे. २००६ पासून ते दिल्ली आयआयटीमध्ये प्राध्यापक आहेत.
माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग यांनी २०१६ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २०२१ मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पंजाब निवडणुकीच्या काळात त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. आपच्या क्रीडा प्रोत्साहन योजनेत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त अशोक मित्तल लवली व्यावसायिक विद्यापीठाचे कुलपती असून संजीव अरोरा हे कृष्णा प्राण ब्रेस्ट कर्करोग धमार्दाय विश्वस्त संस्थेचे संस्थापक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App