वृत्तसंस्था
लखनऊ : लखनऊच्या ( Lucknow ) चौधरी चरण सिंग (अमौसी) विमानतळावर( airport ) किरणोत्सर्गी गळती झाली आहे. 2 कर्मचारी बेशुद्ध झाले आहेत. टर्मिनल-3 सीआयएसएफ आणि एनडीआरएफकडे सोपवण्यात आले आहे. 1.5 किमीचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विमान लखनऊहून गुवाहाटीला जात होते. दरम्यान, विमानतळ टर्मिनल-3 येथे स्कॅनिंग सुरू असताना मशीनने बीपिंगचा आवाज केला. या बॉक्समध्ये एका लाकडी पेटीत कॅन्सरविरोधी औषधे भरलेली होती.
त्यात किरणोत्सर्गी घटक असतात. कर्मचाऱ्यांनी पेटी उघडताच वेगाने गॅस बाहेर आला. त्यामुळे दोन कर्मचारी बेशुद्ध झाले. कर्मचारी बेशुद्ध होताच तेथे चेंगराचेंगरी झाली. लोक इकडे तिकडे धावू लागले. हा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला.
ॲडव्हायजरी जारी
विमानतळ प्रशासनाने सांगितले- टर्मिनल-3 जवळ मालवाहूतून गॅस गळती झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफचे ३ पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सर्व टीम काम करत आहेत. काही औषधांच्या पेट्यांमधून फ्लोरिन वायूची गळती झाली आहे. पथक या घटनेवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले – विमानतळावरील कामकाजावर परिणाम झालेला नाही.
गॅस गळती झाल्यानंतर तेथे उपस्थित लोकांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली. अस्वस्थ व्हायला लागले. डॉक्टरांनी सांगितले की, रेडिओ ॲक्टिव्हच्या प्रभावामुळे बेशुद्ध पडणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि रक्तदाब कमी होणे असे प्रकार होऊ शकतात.
अचानक तीव्र खोकला सुरू होतो. एवढेच नाही तर फुफ्फुसावरही परिणाम होतो. किडनीवरही परिणाम होतो. अनेक एक्स-रे आणि वैद्यकीय संबंधित चाचण्यांमध्ये फ्लोरिन वायूचा वापर केला जातो. काही औषधांचे तापमान सुरक्षित ठेवण्यासाठीही फ्लोरिनचा वापर केला जातो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App