वृत्तसंस्था
लखनौ : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी मोठ्या उत्साहात उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर काल गेल्या खऱ्या… पण पहिल्याच रात्री त्यांच्या दौऱ्यात राडा झाला. उत्तर प्रदेश काँग्रेस मुख्यालयासमोर जमलेल्या बेरोजगार युवकांना काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याचे विडिओ व्हायरल झाले. ही घटना काल रात्री उशीरा घडली आणि आज सकाळपासून #प्रियांका शर्म कर हे ट्रेंडिंगमध्ये आले आहे.Radha on the first night of Priyanka’s Uttar Pradesh tour; # Priyanka Shame on social media for beating up unemployed youth
राजस्थात नियमित संगणक शिक्षक भरती व्हावी या मागणीसाठी बेरोजगार युवक गेल्या २४ दिवसांपासून दिल्लीत धरणे धरून बसले होते. त्यांची प्रियांका गांधींची भेट घालून देतो, असे सांगून युवक काँग्रेसचे पदाधिकारी धीरज गुर्जर आणि जुबेर खान यांनी या युवकांना लखनौला नेले. परंतु, प्रत्यक्षात त्यांची प्रियांका गांधी यांची भेट झालीच नाही.
उलट प्रियांका गांधी या काँग्रेस मुख्यालयातून निघून जाताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बेरोजगार युवकांना मारहाण केली. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. त्याच्या विरोधात हे बेरोजगार युवक आंदोलन करीत होते. त्याच्या रागातून त्यांना लखनौमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली.
#प्रियंका_गांधी_शर्म_करो#संविदा_नहीं_स्थाई_कंप्यूटर_भर्ती Government take unfair action with IT student's.@RajCMO @GovindDotasra @ashokgehlot51 @manojpehul pic.twitter.com/fE1xSfL3P6 — राजकुमार चौधरी (@Rajkuma51563709) July 17, 2021
#प्रियंका_गांधी_शर्म_करो#संविदा_नहीं_स्थाई_कंप्यूटर_भर्ती Government take unfair action with IT student's.@RajCMO @GovindDotasra @ashokgehlot51 @manojpehul pic.twitter.com/fE1xSfL3P6
— राजकुमार चौधरी (@Rajkuma51563709) July 17, 2021
पण या सगळ्या प्रकारामुळे ज्या उत्साहात प्रियांका गांधी यांनी लखनौ दौरा सुरू केला त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येण्याऐवजी बेरोजगार युवकांना झालेल्या मारहाणीच्या बातम्या आल्या. आणि आज सकाळपासून प्रियांका शर्म कर हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App