कर्नाटक निकालात अजून प्राथमिक कल; पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दोन गटांमध्ये धावपळ!!

प्रतिनिधी

बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात सकाळी दहा वाजेपर्यंत अजूनही प्राथमिक कलच येत आहेत. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या आकडेनुसार भाजपला मागे टाकून काँग्रेस पुढील सरकली आहे. पण प्राथमिक कलाच्या आधारेच भाकीत वर्तवण्यात काँग्रेस नेते जास्त आघाडीवर आहेत. इतकेच नाही तर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा देखील सुरुवातीलाच ओपन झाली आहे. Race open in Congress for chief ministership in karnataka

माझ्या वडिलांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्याचे मला पाहिला नक्की आवडेल. काँग्रेस श्रेष्ठ त्यांचीच नेतेपदी निवड करतील, असा दावा सिद्धरामय्या यांचे चिरंजीव यतींद्र सिद्धरामय्या यांनी केला आहे.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आमदार अशोक कुमार यांनी यतींद्र सिद्धरामय्या यांना वेट अँड वॉचचा सल्ला दिला आहे.

तिकडे राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालय जल्लोषाची जोरदार तयारी आहे. कार्यकर्त्यांनी कर्नाटक विजयाचा जल्लोष देखील सुरू केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवनखेडा यांनी मोदींचा खोटा प्रचार कामाला आला नाही, तर काँग्रेसचे पाच वादेच जनतेच्या मनाला भावले. त्यामुळे काँग्रेसचा विजय होतो आहे, असा दावा केला आहे.

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हुबळी धारवाड मतदारसंघातून पिछाडीवर आहेत, तर कर्नाटकचे विद्यमान राज्यमंत्री अश्वथ नारायण आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे आघाडीवर आहेत.

Race open in Congress for chief ministership in karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात