विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिका आणि युरोपीय समुदायाच्या विनंती, दबाव अथवा निर्बंधांना झुगारून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन वरील हल्ले सुरू ठेवले आहेत. पण केवळ 6 तासांसाठी त्यांनी खारकीव्ह परिसरात हवाई हल्ले थांबवण्याचे आदेश दिले होते…!! हे कसे घडले…?? कोणामुळे घडले…??, याची उत्सुकता सगळ्यांना लागली असताना एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे.Putin – Modi talks: Air strikes stopped for 6 hours !!; Indians were safely evacuated from Kharkiv … How did this happen
अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला आणि 6 तासांसाठी त्यांनी खारकीव्हवरील हवाई हल्ले थांबवले. खारकीव्ह परिसरामध्ये 4000 अधिक भारतीय अडकले होते. यामध्ये बहुसंख्येने वैद्यकीय विद्यार्थी होते. सततच्या हवाई हल्ल्यांमुळे त्यांची सुटका करता येत नव्हती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अध्यक्ष पुतिन यांना फोन केला. त्यांच्याशी चर्चा केली. खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांविषयी चिंता व्यक्त केली. या दोघांच्या चर्चेमधून “मानवी सेफ कॉरिडॉर” तयार करण्याचे निश्चित झाले. परंतु रशियन फौजांना खारकीव्हवर लवकरात लवकर ताबा मिळवायचा असल्याने हल्ले फार काळ थांबवता येणार नाहीत, असे पुतीन यांनी स्पष्ट केले. पण मोदी यांच्याशी चर्चेनंतर 6 तास हवाई हल्ले थांबवले तर भारत यांना सुरक्षित बाहेर काढता येईल, असे स्पष्ट झाले. त्यामुळे पुतीन यांनी रशियन हवाई दलाला खारकीव्ह वरील हवाई हल्ले 6 तास थांबवण्याचे आदेश दिले होते.
The Russians apparently agreed to a six hour window for allowing safe passage to all Indians in Kharkiv before an all-out assault begins tonight . The deadline is 2130 IST, about 3 hours from now. #UkraineWar — Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 2, 2022
The Russians apparently agreed to a six hour window for allowing safe passage to all Indians in Kharkiv before an all-out assault begins tonight . The deadline is 2130 IST, about 3 hours from now. #UkraineWar
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 2, 2022
भारतातील संरक्षण तज्ञ आणि ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी यासंदर्भात तपशील सादर करणारी ट्विट केली आहेत. पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपीय समुदायाला जुमानले नाही. त्यांची विनंती सूचना आणि निर्बंधही धुडकावत युक्रेन वरचे हल्ले चालू ठेवले आहेत. पण 6 तासांसाठी खारकीव्ह वरील हल्ले का बंद झाले, याचा खुलासा नितीन गोखले यांनी ट्विट मधून केला आहे.
सोशल मीडियावर या गोष्टीची जोरदार चर्चा असून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणत्या गोष्टी कशा अपरिहार्य असतात, याचेही वर्णन केले आहे. भारत “तटस्थ” राहिला म्हणून रशियाने एक कृतज्ञताभाव म्हणून मोदींचे ऐकले, असेही मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
Putin – Modi talks: Air strikes stopped for 6 hours !!; Indians were safely evacuated from Kharkiv … How did this happen
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App