विशेष प्रतिनिधी
देहराडून : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर ना सतपाल महाराजांची निवड झाली ना धनसिंह रावत यांची निवड झाली. मुख्यमंत्रीपदावर निवडले गेलेत ते पुष्करसिंह धामी. त्यांचे नाव माध्यमांनी गेले दोन दिवस चर्चेत पण आणले नव्हते. माध्यमांनी नेतृत्वाच्या रेसची चर्चा सतपाल महाराज आणि धनसिंह रावत या दोन नावांच्या भोवतीच केंद्रीत ठेवली आणि इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चॉइसने त्यांना चकविले.pushkar singh dhami was OSD to bhagat singh koshiyari when he was uttarakhand CM
माध्यमांनी सतत चर्चेत ठेवल्याने उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि उच्च शिक्षणमंत्री धनसिंह रावत यांचे समर्थक डेहराडूनच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यांच्या नावाचा समावेश राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दावेदारांमध्येदेखील होता. आपल्या नेत्याची निवड झाली की त्याच्या घरासमोर ढोल वाजवून जल्लोष करायची समर्थकांची तयारी होती. ती सगळी तयारी वाया गेली.
मोदींनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाला पसंती दिली. त्यांची त्रोटक माहिती माध्यमांनी दिली आहे. पण ती देखील त्यांचा राजकीय वारसा सांगण्यासाठी पुरेशी आहे. पुष्करसिंह धामी हे राजनाथ सिंह यांचे समर्थक मानले जातात आणि महत्त्वाचे म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे बहुचर्चित राज्यपाल आणि
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोशियारी यांचे पुष्करसिंह धामी हे विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात OSD होते.याचा अर्थ त्यांचा प्रशासनातल्या बारकाव्यांचा चांगला अभ्यास दिसतो आहे. याचा उपयोग ते मुख्यमंत्री म्हणून प्रशासन चालवताना कसा करून घेतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी आपला पी. ए. अभिमन्यू पवार यांना आमदार केले. उत्तराखंडमध्ये भगतसिंह कोशियारींचे OSD पुष्करसिंह धामी हे मुख्यमंत्री बनलेत. याचा अर्थ नेत्यांच्या जवळ असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाही मोठी जबाबदारी भाजप देते असा दिसून येतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App