विशेष प्रतिनिधी
चंडीगड : पंजाबचा आम आदमी पार्टीचा नेता आणि राज्याचा मंत्री बलकार सिंग याचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. नोकरी मागणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीला तिचे कपडे उतरवायला लावून तिच्या समोर हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात तसेच आम आदमी पार्टीच्या गोटात नव्या कारनाम्यामुळे खळबळ माजली आहे. आम आदमी पार्टी एकापाठोपाठ एक घोटाळ्यांमध्ये अधिकाधिक रुतत चालली आहे. Punjab’s Aam Aadmi Party minister Balkal Singh’s obscene video
दिल्लीच्या दारू घोटाळ्यात स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडकून ते पुन्हा 2 जूनला तुरुंगात जायच्या वाटेवर आहेत. त्यांचे 3 मंत्री आधीच वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्या पाठोपाठ खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण प्रकरणाचे शुक्लकाष्ट आम आदमी पार्टीच्या मागे लागले आहे. आता त्या पाठोपाठ पंजाबचा मंत्री बलकार सिंह याचा अश्लील व्हिडिओ समोर आल्याने आम आदमी पार्टीच्या राजकीय आणि सामाजिक चारित्र्यावरच ठपका लागला आहे.3
https://twitter.com/TajinderBagga/status/1795021838587928733
21 वर्षांची एक युवती बलकार सिंग यांच्याकडे नोकरी मागत होती. परंतु तिला त्याने व्हिडिओ वरच तिचे कपडे उतरवायला सांगितले आणि तिच्यासमोर बलकार सिंगाने हस्तमैथुन केले. हा व्हिडिओ समोर येताच बलकार सिंग याच्या विरोधात पंजाब आणि इतरत्रही प्रचंड संताप उसळला असून विरोधी भाजपने त्याच्या ताबडतोब राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी हा व्हिडिओ शेअर करून बलकार सिंग या मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App