विशेष प्रतिनिधी
चंडीगड – हरियानाचे शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणावरून आता पंजाब व हरियाणातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लाठीमाराचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी खट्टर यांच्यावर लाठीमारप्रकरमी नाव घेत टीका की आहे. या आंदोलनामुळे खट्टर व सिंग पुन्हा आमनेसामने आले आहेत.Punjab Nad Haryana CM targets each other
पत्रकारांशी बोलताना खट्टर म्हणाले, काळे झेंडे दाखविणे, घोषणाबाजी करणे समर्थनीय आहे पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना कार्यक्रमस्थळी येण्यापासून रोखण्यात आले. याआधी विधानसभा अध्यक्षांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती.
लोकशाहीमध्ये अशाप्रकारच्या बाबींना मान्यता देता येत नाही. हरियानातील शेतकरी आंदोलनामागे पंजाबचा हात आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शेतकरी नेते बलमबीर राजेवाल यांना लाडू भरविले होते. हे कटू सत्य आहे.
त्यांच्यावर पलटवार करताना कॅ.अमरिंदरसिंग म्हणाले, शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी भाजपच जबाबदार आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून हरियाना सरकारने त्यांचा कृषीविरोधी अजेंडा दाखवून दिला आहे.
दरम्यान हरियानातील कर्नाल येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा ६ सप्टेंबर रोजी राज्य सचिवालय आम्ही ताब्यात घेऊ असा इशारा आज किसान महापंचायतीने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App