Punjab Congress : पंजाब कॉंग्रेसमध्ये आता एक नवीन वाद सुरू झाला आहे. आधीच जुन्या मतभेदांवरून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असतानाच कॅप्टन अमरिंदर सरकारने दोन आमदारांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याप्रकरणी पक्षांतर्गत विरोध सुरू झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्यासह अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी हा निर्णय बदलण्यास किंवा परत घेण्यास ठाम नकार दिला आहे. Punjab Congress MLA’s sons Govt Jobs issue several leaders against the CM Amarindar
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : पंजाब कॉंग्रेसमध्ये आता एक नवीन वाद सुरू झाला आहे. आधीच जुन्या मतभेदांवरून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असतानाच कॅप्टन अमरिंदर सरकारने दोन आमदारांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याप्रकरणी पक्षांतर्गत विरोध सुरू झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्यासह अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी हा निर्णय बदलण्यास किंवा परत घेण्यास ठाम नकार दिला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी दोन्ही आमदारांच्या मुलांना अनुकंपा प्रकारातील नोकरी देण्याच्या निर्णयाला चुकीचे म्हटले आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि फतेहगड साहिबचे आमदार कुलजित नागरा म्हणाले की, मंत्रिमंडळाची बैठक बोलावून हा निर्णय मागे घ्यावा.
दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेसचे दोन आमदार फतेह जंग बाजवा आणि राकेश पांडे यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय रद्द किंवा बदलण्यास नकार दिला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
सुनील जाखड़ म्हणाले, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्याबद्दल देश आणि समाज नेहमीच कृतज्ञ आहे, परंतु ज्या प्रकारे या नेमणुका केल्या गेल्या, त्यांना अनुकंपाच्या वर्गात ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची व नेमणुका रद्द करण्याची मागणी केली. जाखड म्हणाले की, या निर्णयाचा दीर्घकाळ परिणाम होईल कारण लाभार्थींच्या पार्श्वभूमीचा विचार करून हा निर्णय तर्कसंगत ठरू शकत नाही. मुख्यमंत्र्यांना चुकीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे सरकारवर आरोप होऊ शकतो, जे योग्य होणार नाही. लोकप्रतिनिधी लोकांना स्वत:च्या हितासाठी नव्हे, तर त्यांच्या हिताबद्दल बोललेले आवडतात.
Punjab Congress MLA’s sons Govt Jobs issue several leaders against the CM Amarindar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App