प्रताप सरनाईक यांच्या उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले – कोण त्रास देतोय ते शोधलं पाहिजे!

Shiv Sena MP Sanjay Raut Reaction On MLA Pratap Sarnaik Letter To CM Uddhav Thackeray

Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे अवघ्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांनी पत्रातून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली आहे. महाविकास आघाडीत लवकरच फूट पडणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधलं पाहिजे!’ Shiv Sena MP Sanjay Raut Reaction On MLA Pratap Sarnaik Letter To CM Uddhav Thackeray


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे अवघ्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांनी पत्रातून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली आहे. महाविकास आघाडीत लवकरच फूट पडणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधलं पाहिजे!’

प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मोजक्यात शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. ‘सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया द्यावी, असं काय आहे. मुळात विनाकरण त्रास दिला जात आहे असं ते म्हणतात, विनाकरण कोण त्रास देतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच या पत्रातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. विनाकारण महाविकास आघाडीतील नेत्यांना कोण त्रास देतंय, याचा विचार केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले प्रताप सरनाईक आपल्या पत्रात?

प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दोन पानांचं पत्रं लिहून आघाडी सरकारमधील काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेलं बरं. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते आणखी तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं, असं त्यांनी म्हटलं आहे.

भविष्यात शिवसेनेला फायदाच

सरनाईक म्हणाले, पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष कमकुवत करत आहेत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक, अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही सरनाईक आपल्या पत्रात म्हणाले.

Shiv Sena MP Sanjay Raut Reaction On MLA Pratap Sarnaik Letter To CM Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण