विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर, पूर्व वा असो दक्षिण काँग्रेस सर्वत्र बंडाच्या अडचणीत…!!, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. उत्तरेत पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचे वाद आता पक्षाचे केंद्रीय प्रभारी हरीश रावत यांच्यावर थेट आरोप करण्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. पण दक्षिणेतील केरळमध्ये काँग्रेसच्या हायकमांड विरोधात बंडखोरी करणारे पी. एस. प्रशांत यांना पक्षाने बाहेरचा दरवाजा दाखवला आहे. PS Prasanth has been expelled from the party for challenging the Congress High Command and making wild allegations
प्रशांत यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय नेते काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याविरोधात तक्रार करणारे पत्र राहुल गांधी यांना लिहिले आहे. हा शिस्तभंग असल्याचे ठरवून केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनी प्रशांत यांची केरळच्या काँग्रेसच्या चिटणीस पदावरून आणि पक्षातूनही हकालपट्टी केली आहे.
एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसाम या पूर्वेकडील राज्यात काँग्रेस पक्ष फुटून उरलासुरला ही संपतो आहे. काँग्रेसचे मोठे नेते एकापाठोपाठ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये जाऊन पोहोचत आहेत.
त्यातच दक्षिणेतील राज्य केरळची भर पडली आहे. केरळमध्ये पलक्कड जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष, ज्येष्ठ नेते गोपीनाथम यांनी पक्षातल्या गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे, तर पक्षाचे केरळचे प्रदेश चिटणीस पी. एस. प्रशांत यांनी काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या विरोधात तक्रार करणारे पत्र खासदार राहुल गांधी यांना पाठवले आहे. वेणुगोपाल यांनी पक्षाच्या संघटनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोवा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेस संघटना ढासळली, असा आरोप प्रशांत यांनी या पत्रात केला आहे.
#UPDATE | PS Prasanth has been expelled from the party for challenging the Congress High Command and making wild allegations: Kerala Congress chief K Sudhakaran (File photo) pic.twitter.com/Wl9cI6Oyk8 — ANI (@ANI) August 30, 2021
#UPDATE | PS Prasanth has been expelled from the party for challenging the Congress High Command and making wild allegations: Kerala Congress chief K Sudhakaran
(File photo) pic.twitter.com/Wl9cI6Oyk8
— ANI (@ANI) August 30, 2021
वास्तविक के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे पक्षाचे संघटन सरचिटणीसपद आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमधील संघटनात्मक निर्णय घेण्याची आणि वाद सोडवण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि मंत्री टी. एस. सिंगदेव यांच्यातील वाद सोडविण्यासाठी दोन्ही नेते वेणुगोपाल यांनाच भेटले होते.
परंतु, आता दस्तुरखुद्द वेणुगोपाल यांच्या विरोधातच केरळमधल्या प्रदेश चिटणीस प्रशांत यांनी थेट राहुल गांधींकडे तक्रार केल्यामुळे काँग्रेस संघटनेची अवस्था किती बिकट आहे हे स्पष्ट होते आहे. परंतु या पार्श्वभूमीवर प्रशांत यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेण्याऐवजी त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून प्रशांत यांना पक्षातून हकालपट्टी करून शिक्षा देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App