वृत्तसंस्था
नवी दिल्ली – जम्मू – काश्मीर संदर्भातील महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू होण्यापूर्वी राजनैतिक पातळीवर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Proposed action plan against Lashkar e Toiba and Jaish e Mohammad to counter terror financing including MOU b/w SCO & FATF
चीनचा सहभाग असलेल्या शांघाय सहकार्य परिषद अर्थात SCO मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानातल्या लष्कर ए तैय्यबा आणि जैश ए महंमद संघटनांवर कठोर कारवाईचा प्रस्ताव मांडला. SCO framework मध्ये म्हणजे शांघाय सहकार्य परिषदेच्या चौकटीत राहून या दोन्ही दहशतवादी संघटनांवर सदस्य देशांनी कठोर कारवाई करावी. त्यामध्ये बंदीपासून सैनिकी कारवाईपर्यंतचा समावेश असावा असा प्रस्ताव अजित डोवाल यांनी भारताच्या वतीने मांडला. या बैठकीनंतर अजित डोवाल नवी दिल्लीत परतले असून ते आता पंतप्रधानांसमवेत जम्मू – काश्मीर विषयक सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाले आहेत.
अजित डोवालांनी संबंधित प्रस्ताव मांडलेल्या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधी देखील हजर होते. कारण पाकिस्तान हा शांघाय सहकार्य परिषदेचा सदस्य देश आहे. यामध्ये चीन, रशियातून बाहेर पडलेले पूर्वीचे सगळे सोविएट युनियनमधील देश यांचा समावेश आहे. डोवाल यांनी जैश ए महंमद आणि लष्कर ए तैय्यबा या संघटनांवर कठोर कारवाईचा प्रस्ताव मांडल्याने पाकिस्तानी प्रतिनिधींची कुचंबणा झाली. कारण या प्रस्तावास उघडपणे विरोध करता येईना आणि पाठिंबा देखील देता येईना. कारण या दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅन असल्या तरी पाकिस्तानातून ऑपरेट करतात.
अजित डोवाल हे जम्मू – काश्मीर विषयक बैठकीत शांघाय सहकार्य परिषदेत मांडलेल्या प्रस्तावाची माहिती देणे अपेक्षित आहे. या बैठकीत डॉ. फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेते हजर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App