बीबीसीची डॉक्युमेंटरी मोदी विरोधी प्रपोगंडा आणि लांच्छनास्पद पत्रकारिता; कॉन्सर्वेटिव्ह ब्रिटिश खासदाराचाच हल्लाबोल

वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बी बी सी ने प्रकाशित केलेली “द मोदी क्वेश्चन” डॉक्युमेंटरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला प्रापोगांडा आहे, इतकेच नव्हे, तर ती लांच्छनास्पद पत्रकारिता आहे, असा हल्लाबोल ब्रिटिश खासदारांनीच केला आहे. ब्रिटिश हुजूर पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी बीबीसी इंडियाच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट घातलेल्या केलेल्या सर्व विषय देखील भाष्य केले आहे. असे सर्वे काही विशेष बाब नाही बीबीसी जर नियमानुसार काम करत असेल त्यांच्या गुंतवणुकी योग्य असतील तर त्यांना घाबरायचे काहीच कारण नाही. बीबीसीने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कायदेशीर कारवाई होईलच, असे ब्लॅकमॅन यांनी स्पष्ट केले आहे. “Propaganda video, shoddy journalism, should never have been broadcast by BBC.…

“द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंटरी संदर्भात बॉब ब्लॅकमॅन म्हणाले, की बीबीसी डॉक्युमेंटरीत गुजरात दंगली बाबत मूळातच व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आलेला नाही. त्यांनी सत्य देखील तपासून पाहिलेले नाही. सुप्रीम कोर्टाने देखील या दंग्यांसंदर्भातला तपास लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निर्दोष सुटका केली आहे. त्यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही. याकडे डॉक्युमेंटरी मध्ये पूर्ण दुर्लक्ष केले आहे. गुजरात दंग्याचे सत्य दाखविण्याच्या नावाखाली अर्धसत्य दाखवले आहे. बीबीसीचे हे पत्रकारितेसाठी सुद्धा लांच्छनास्पद रूप आहे, असा हल्लाबोल बॉब ब्लॅकमॅन यांनी केला आहे.

– कॉन्सर्वेटिव्ह पक्षाचे भारत मित्र खासदार

बॉब ब्लॅकमॅन हे हुजूर पक्षाचे म्हणजे काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे ब्रिटन मधले ज्येष्ठ खासदार आहेत. 1986 पासून ते ब्रिटनच्या राजकारणात कार्यरत आहेत. ते इजरायल मित्र आणि भारत मित्र आहेत. ब्रिटिश काँझर्व्हेटिव्ह पक्षाची भूमिका सर्वसाधारणपणे पाकिस्तान धार्जिणी आणि भारत विरोधी राहिली असताना बॉब ब्लॅकमॅन यांच्यासारखे त्याच पक्षाचे खासदार मात्र भारत मित्र आणि इजरायल मित्र होतात, हेच त्यांचे वेगळेपण आहे.

केंद्रातील मोदी सरकारने काश्मीर मधले 370 कलम हटविण्याचे त्यांनी ब्रिटनमध्ये समर्थनही केले होते. ब्रिटन हिंदू फोरमच्या कार्यक्रमात ते अनेकदा सहभागी झाले आहेत.

“Propaganda video, shoddy journalism, should never have been broadcast by BBC.…

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात