डेस्टिनेशन वेडिंगला भारतातही चालना; मोदी सरकारचे प्रोत्साहन; मिशन मोडमध्ये पर्यटन विकास!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे वेड खूप बघायला मिळते. प्रत्येकाला आपल्या जीवनातील हे खास मोमेंट्स मेमोरेबल व्हावे असे वाटते. त्याचवर विचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की राज्यांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग विवाह संस्कारांची देवाणघेवाण भारतीय टुरिझमला चालना देऊ शकते. राज्यांनी विशेष पॅकेज जाहीर करावे जेणेकरून लोकांना डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास करणे’ या विषयावर इकॉनोमिकल वेबिनारमध्ये पंतप्रधान म्हणाले की, डेस्टिनेशन वेडिंगमुळे पर्यटनाला मोठी संधी मिळते. आणि आपले वेडिंग कल्चर यातूनच जपले जाऊ शकते. Promotion of destination weddings in India too; Encouragement by Modi Government; Tourism Development in Mission Mode!!

भारतीय पर्यटनक्षेत्र उंचीवर नेण्यासाठी आपण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे.’ यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतीय लोक परदेशात जातात. पण आपली राज्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी विशेष पॅकेज जाहीर करू शकतील का? इतर राज्यांमध्ये जाऊन त्यांच्या संस्कृतीप्रमाणे आपण लग्न करावे. गुजरात मधील एखादा व्यक्ती तामिळनाडूत जाऊन तामिळ संस्कृतीनुसार लग्न करेल, असे होऊ शकेल का?, याचा निश्चित विचार केला पाहिजे.

पंतप्रधानांनी भारताप्रती वाढत्या आकर्षणाची दखल घेत यावर्षी जानेवारी महिन्यात ८ लाख विदेशी पर्यटक भारतात आले असल्याची माहिती दिली. डेस्टिनेशन वेडिंगमुळे पर्यटनाला मोठी संधी मिळते. आपल्या देशातील टॉप क्लास लोक परदेशात जातात. पण आता मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गही देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जात आहेत. आम्ही अद्याप या दिशेने काम करत नाही, काही ठिकाणे त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, त्यामुळे डेस्टिनेशन वेटिंग मधून टुरिझमचा बिझनेस कसा वाढेल हे देखील आपण बघितले पाहिजे.

– टुरिझम आणि मध्यमवर्ग

जे लोक अशाच चांगल्या डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न बघतात. पण पूर्ण करू शकत नाहीत. अशा लोकांना यातून पुन्हा एकदा चांगली आशा निर्माण होणार आहे. आपली खास मोमेंट आपल्याला हव्या अशा पद्धतीने साजरी करता येणार आहे. हीच बाब लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरतीये. पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या बाबतची पंतप्रधानांचे हे वक्तव्य पोस्ट मधून बरीच व्हायरल होताना दिसत आहे.

Promotion of destination weddings in India too; Encouragement by Modi Government; Tourism Development in Mission Mode!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात