विशेष प्रतिनिधी
लखनौ – मी काही राजकीय पर्यटक नाही. मी आणि माझा भाऊ राहुल हे गांभीर्याने राजकारण करणारे नेते नाहीत असे भासविण्यासाठी भाजपकडून तसा अपप्रचार केला जातो अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.Priyanka lashes on BJP
तसेच उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीसाठी इतर राजकीय पक्षांबरोबर युती करण्याविषयी आपल्या पक्षाचा दृष्टिकोन खुला असल्याचेही गांधी यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी राज्यातील ४०३ जागा काँग्रेस स्वबळावर लढविणार की युती करणार, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, याविषयी इतक्या लवकर भाष्य करणे घाईचे ठरेल.
युतीची शक्यता मी फेटाळून लावणार नाही. आमचा दृष्टिकोन एकदम बंदिस्त नसून खुला आहे. इतर पक्षांचाही तसा असावा. माझा दृष्टिकोन खुला आहे, पण माझे प्राधान्य माझ्या पक्षाला आहे. आमचे ध्येय भाजपला हरविण्याचे आहे.
पक्षसंघटन हा आपले लक्ष केंद्रित असलेला विषय आहे. त्यासाठी शांतपणे बरेच कार्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले. पक्ष राज्यात सुमारे तीन दशके सत्तेपासून दूर होता. तो कमकुवत झाला आहे, पण आता पुरेपूर प्रयत्न होत असून पक्षात बरीच जान निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App