प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, राहुल गांधींबाबत 24 तासांत निर्णय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर सस्पेन्स कायम आहे. प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने आहे. त्या फक्त प्रचार करणार आहेत.Priyanka Gandhi will not contest Lok Sabha elections, decision on Rahul Gandhi within 24 hours

त्याचवेळी राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय उद्या येऊ शकतो. याआधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात अशी बातमी होती. या जागांवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रियंका आणि राहुल अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतात, असे बोलले जात होते.



अमेठी आणि रायबरेलीला जाण्याआधी राहुल आणि प्रियंका अयोध्येला जाऊ शकतात, तिथे त्यांना रामलल्लाचं दर्शन घेता येईल असं म्हटलं जात होतं.

गेल्या निवडणुकीत राहुल गांधींचा अमेठीतून पराभव

2019च्या निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, वायनाडमधून निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 5 जागा आहेत. 2022च्या निवडणुकीत, समाजवादी पक्षाला अमेठी आणि गौरीगंजमधून दोन आमदार मिळविण्यात यश आले होते, तर सलूनची जागा अत्यंत किरकोळ मतांनी गमावली होती. अमेठीत तीन आमदार मिळवण्यात भाजपला यश आले.

सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्याने रायबरेलीच्या जागेवर साशंकता

2019 मध्ये सोनिया गांधी यांनी ही आपली शेवटची लोकसभा निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी रायबरेलीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. सोनिया गांधी एकूण पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. सोनियांनी रायबरेलीसोबतचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध सोडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या खूपच भावुक झाल्या होत्या.

Priyanka Gandhi will not contest Lok Sabha elections, decision on Rahul Gandhi within 24 hours

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात