सगळेच प्रभारी बदलून काँग्रेसने टाकली “कात” की प्रियांकांना करून दिला “एस्केप रूट”??

उत्तर प्रदेशाच्या जबाबदारीतून प्रियांका गांधींची सुटका; काँग्रेस प्रभारीपदी अविनाश पांडे!!; महाराष्ट्रात रमेश चेन्नीथला प्रभारी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक आणि तीन राज्यांतील दारूण पराभवानंतर काँग्रेसने मोठे संघटनात्मक फेरबदल केले असून सर्व राज्यांमध्ये प्रभारी काँग्रेस अध्यक्षांनी बदलले आहेत.Priyanka Gandhi Vadra has been relieved from the post of AICC in-charge of UP Congress

याचे वर्णन सर्वच माध्यमांनी काँग्रेसने कात टाकली, असे केले आहे. पण एका झटक्यात सगळेच प्रभारी बदलून काँग्रेसने खरंच कात टाकली की प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशच्या जबाबदारीतून एस्केप रूट देण्यासाठी एवढी सगळी राजकीय मशागत करण्यात आली??, असा सवाल तयार झाला आहे.

कारण प्रभारी बदलातला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशाच्या जबाबदारीतून मोकळे करत त्यांना “एस्केप रूट” देण्यात आला, हा आहे. त्यांच्याजागी अविनाश पांडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून रमेश चेन्निथला यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मीडियालाही ही माहिती दिली.

प्रियांकांना उत्तर प्रदेशात अपयश

उत्तर प्रदेशात 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी केले होते. पण या निवडणुकीत त्यांना काहीच प्रभाव पडता आला नाही. काँग्रेसचा दारुण पराभव झाला. असा पराभव झाल्यावर एरवी अन्य कोणत्या नेत्याला काँग्रेसने लगेच कारवाई करून प्रभारी पदावरून काढून टाकले असते. परंतु प्रियांका गांधींना तेव्हा हात लावणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या सर्वच राज्यांमध्ये प्रभारी बदलल्याचे दाखवून काँग्रेस अध्यक्षांनी प्रियांका गांधींची उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून “सुटका” केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला जिंकून देण्याची जबाबदारी प्रियंका गांधी यांची उरणार नाही, तसेच लोकसभा निवडणुकीतल्या संभाव्य पराभवाची जबाबदारी ही प्रियांका गांधींच्या शिरावर राहणार नाही. शिवाय इतर कोणतेही राज्य त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या सोनिया गांधी यांच्या ऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी अविनाश पांडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी असतील.

केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. काँग्रेसचे याआधीचे प्रभारी एच. के. पाटील हे कर्नाटकच्या मंत्रिमंडळात आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत महत्वाची जबाबदारी पार पाडलेले माणिकराव ठाकरे यांना गोव्यासह दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रभारी करण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी करण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे छत्तीसगडचे प्रभारी असतील, तर जितेंद्र सिंह हे आसाम आणि मध्य प्रदेश, रणदीप सिंग सुरजेवाला हे कर्नाटकचे, दीपक बाबारिया हे दिल्ली व हरयाणाचे, कुमारी सेलजा या उत्तराखंड, जी. ए. मीर हे झारखंड व पश्चिम बंगाल आणि दीपा दासमुन्शी यांच्याकडे केरळ, लक्षद्वीप आणि तेलंगणाच्या प्रभारी असतील.

बिहारची जबाबदारी मोहन प्रकाश यांच्याकडे देण्यात आली आहे, तर डॉ. चेलाकुमार हे मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, डॉ. अजोय कुमार हे ओडिशा, तमिळनाडू व पदुच्चेरीचे, भरतसिंह सोलंकी हे जम्मू आणि काश्मीरचे, राजीव शुक्ला हे हिमाचल प्रदेश आणि चंदीगडचे प्रभारी असतील. सुखजिंदरसिंग रंधवा यांच्याकडे राजस्थान, देवेंदर यादव यांच्याकडे पंजाब, गिरीश चोडणकर यांच्याकडे त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालँडची जबाबदारी असेल. मणिक्कम टागोर हे आंध्र प्रदेश, अंदमान निकोबारचे प्रभारी असतील.

Priyanka Gandhi Vadra has been relieved from the post of AICC in-charge of UP Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात