विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीच्या रामलीला मैदानातून रामायण सुनावत प्रियांका गांधी यांनी आज वाचून दाखविल्या INDI आघाडीच्या 5 मागण्या!! रामलीला मैदानात आज इंडिया आघाडीची महासभा झाली. या सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी धडाकेबाज भाषण केले. त्यांनी या भाषणात निवडणूक आयोगाकडे 5 महत्त्वाच्या मागण्या केल्या.
प्रियांका गांधी यांनी मोदींना रामायणाचे सूत्र सुनावले. त्या म्हणाल्या, मला INDI आघाडीची 5 सूत्रे मागण्या वाचण्यास सांगण्यात आलेय. पण त्याआधी मला एक छोटीसी गोष्ट मला सांगायची आहे. दिल्लीकरांना माहिती आहे की, रामलीला हे दिल्लीतील सुप्रसिद्ध मैदान आहे. इथे मी लहानपणापासून येत आहे. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी इथे याच मैदानात रावणाच्या पुतळ्याचे दहन होते. मी लहान होते, तेव्हा माझी आजी इंदिरा यांच्यासोबत येत होते. त्यांच्या पायांजवळ बसून रामलीला पाहत होते. आज जे सत्तेवर आहेत, ते स्वत:ला रामभक्त समजतात. त्यामुळे एक गोष्ट त्यांना सांगायला हवी, की भगवान राम जेव्हा सत्यासाठी लढले तेव्हा त्यांच्याजवळ सत्ता नव्हती. त्यांच्याजवळ संसाधने नव्हती. त्यांच्याजवळ तर रथही नव्हता. रथ, संसाधने रावणाजवळ होती. सेना रावणाजवळ होती. रावणाजवळ सोने होते. तो तर सोन्याच्या लंकेत राहत होता. भगवान रामाजवळ सत्य, आशा, आस्था, प्रेम, परोपकार, विनय, संयम, साहस होते.
सरकारमध्ये बसलेल्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करुन देऊ इच्छिते, रामांच्या जीवनगाथेचा संदेश काय होता? सत्ता सदैव राहात नाही. सत्ता येते आणि जाते. अहंकार एकेदिवशी गळून पडतो. हाच संदेश श्रीरामांचा आणि त्यांच्या जीवनाचा होता.
5 मागण्या :
1) भारतीय निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीत समान संधी सुनिश्चित केली पाहिजे.
2) निवडणूक आयोगाकडून निवडणुकीत हेराफेरी करण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षांच्या विरोधात इनकम टॅक्स, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणाद्वारे केल्या जाणाऱ्या दबावाची कारवाई रोखली गेली पाहिजे.
3) हेमंत सोरेन, आणि अरविंद केजरीवाल यांना तातडीने सोडून द्यावे.
4) निवडणूक काळात विरोधी पक्षांची आर्थिक रुपात गळा घोटण्याची कारवाई तातडीने बंद करावी.
5) निवडणुकीचा उपयोग करुन भाजपकडून बदल्याच्या भावनेत जबरदस्ती वसुली, धनशोधाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली एक एसआयटी गठीत करावी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App