विशेष प्रतिनिधी
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील कारभारणींना खºया अर्थाने हक्क दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेमधील 80 टक्के घरे महिलांच्या नावावर आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. Prime Minister’s Housing Scheme are in the name of women, informed Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान शहरी आवास योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशातील 75 जिल्ह्यांतील 75 हजार लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते आज आभासी पद्धतीने घरकुलांचे वितरण करण्यात आले, तसेच स्वातंत्र्याची 75 वर्षे- नवीन शहरी भारत बदलते शहरी परिदृश्य या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेमुळे देशातील तीन कोटी कुटुंबांच्या घरांचे स्वप्न साकार
पंतप्रधान म्हणाले, नवीन घरकुल मिळालेले 75 लाभार्थी यावेळचे छठ, दिवाळी, दसरा आणि ईद हे सण स्वत:च्या घरात साजरे करू शकतील. पंतप्रधान आवास योजनेतील 80 टक्के घरे ही महिलांच्या नावावर असल्याचे सांगण्यास मला आनंद होत आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1.13 कोटी घरे बांधण्यासाठी 2014 मध्ये आमच्या सरकारने परवानगी दिली. त्यापेक्षा 50 लाखांपेक्षा जास्त घरे बांधली गेली असून, ती गरिबांना देण्यात आली आहेत. उत्तरप्रदेशमधील याआधीच्या सरकारने गरिबांसाठी घरे बांधली नव्हती.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2017 पूर्वी 18 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, गरिबांसाठी 18 घरेही बांधण्यात आली नव्हती. दुसरीकडे योगी सरकारने 9 लाख घरे बांधली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App