पंतप्रधान आवास योजनेमुळे देशातील तीन कोटी कुटुंबांच्या घरांचे स्वप्न साकार

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील दोन कोटी लोकांना घरे मिळाली आहेत. शहरी भागात ७० लाखांहून अधिक घरे दिली असून लवकरच ती संख्या एक कोटीवर जाणार आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील दोन कोटी लोकांना घरे मिळाली आहेत. शहरी भागात ७० लाखांहून अधिक घरे दिली असून लवकरच ती संख्या एक कोटीवर जाणार आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. More than 3 cores home through Pradhan mantri Awad Yojna
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रकल्पाच्या घरांची सोडत काढण्यात आली. त्यावेळी जावळेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सोडत झाली. यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, पंतप्रधान आवास योजना जाहीर झाली त्यावेळी घरे मिळतील असे वाटत नव्हते. मात्र या योजनेतील घरे प्रत्यक्षात आली आणि गरिबांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले. केवळ घर उपलब्ध व्हावे, असा हेतू नसून ती स्वस्त तसेच व्यवस्थित व दर्जेदार असावित, असा प्रयत्न आहे.
कोरोनाची पहिली लाट आपण परतवून लावली आहे. आता दुसरी लाट हाताबाहेर जाता कामा नये. त्यासाठी मास्क वापरणे आवश्यक असतानाच नियम पालन केले पाहिजे. हृदयातील अंतर नको, मात्र माणसांनी आपआपसांत अंतर राखून फिजिकल डिस्टन्स पाळला पाहिजे. दीड कोटी लोकांना कोरोनाची लस दिली, असे जावडेकर यांनी सांगितले.
देशातील तीन कोटी घरांना नळाने पाणी मिळत नसून महिलांना हंडा घेऊन फिरावे लागते. त्यासाठी केंद्र सरकारकडून ‘हर घर नल से जल’ ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच देशातील आठ कोटी महिलांना गॅसवर स्वयंपाक करायला मिळत आहे. जनधन योजेनेची खाती उघडून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होते. ४० कोटी लोकांची खाती उघडली असून, १३ लाख कोटी रुपये या खात्यांवर जमा केले आहेत, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

More than 3 cores home through Pradhan mantri Awad Yojna

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*