वृत्तसंस्था
वॉशिंग्टन: भारतीय शिल्पकेलेची जगात ख्याती आहे. या कलाकृतींना जगभरात मागणी असते. त्या अनेकदा चोरून परदेशात पाठविल्या देखील जातात. परंतु अशा १५७ वस्तू आणि कलाकृती पुन्हा भारतात येणार आहेत. विशेष म्हणजे ऐतिहासिक भारताची ओळख सांगणाऱ्या या वस्तू खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. Prime Minister Narendra Modi will bring from America 157 Rare historical Indian objects
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी भारताच्या संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या दुर्मिळ पण अमेरिकेत आढळलेल्या वस्तू, मूर्ती आणि अन्य साहित्य असे १५७ नग त्यांना अमेरिकेने भेट दिले गेले. या सर्व वस्तू मोदी भारतात परत घेऊन येत आहेत.
यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे. आपल्या व्यग्र दौऱ्यात मोदी यांनी वेळात वेळ कडधुम या वस्तूंचे निरीक्षणही केले. तसेच भारताचा सांस्कृतिक वारसा भारताला पुन्हा सोपविल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App