पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘भारत मंडपम’चे उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

सप्टेंबरमध्ये या परिसरात G-20 नेत्यांची बैठक प्रस्तावित आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ITPO प्रगती मैदानाचे उद्घाटन केले. त्याला ‘भारत मंडपम’असे नाव देण्यात आले. प्रगती मैदानाचा ITPO पुन्हा 123 एकरमध्ये पूर्णपणे विकसित झाला आहे. पंतप्रधानांनी बुधवारी सकाळी दिल्लीतील पुनर्विकसित भारत मंडपम (ITPO) कॉम्प्लेक्समध्ये वैदिक विधींसह हवन-पूजन केले. त्याच वेळी, ITPO कॅम्पसचे औपचारिक उद्घाटन करून, त्यांनी ते राष्ट्राला समर्पित केले आहे. Prime Minister Narendra Modi inaugurated Bharat Mandapam

सप्टेंबरमध्ये या परिसरात G-20 नेत्यांची बैठक प्रस्तावित आहे. 123 एकरमध्ये पसरलेल्या भारत मंडपमला प्रगती मैदान कॉम्प्लेक्स म्हणूनही ओळखले जाते. सरकारने, जानेवारी 2017 मध्ये त्याच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देताना, राष्ट्रीय राजधानीत जागतिक दर्जाचे IECC स्थापन करण्याचे मान्य केले होते. सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आला आहे.

उद्घाटन समारंभात मोदी म्हणाले, “भारत मंडपम भव्य, विशाल, विहंगम आहे. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. भारतातील कामगारांचे अभिनंदन. आज कामगारांना भेटून आनंद झाला.” पंतप्रधान मोदींनी ITPO परिसरात हवन आणि पूजेनंतर कामगारांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतली.

प्रगती मैदान संकुलाचा केंद्रबिंदू म्हणून कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यात आले आहे. हा एक भव्य वास्तुशिल्प आहे. जे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यापार संमेलनं, परिषद, अधिवेशने आणि इतर प्रतिष्ठित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Prime Minister Narendra Modi inaugurated Bharat Mandapam

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात