जाणून घ्या,समारोपाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांना काय आवाहन केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेचा आज यशस्वी समारोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या समारोपाची घोषणा केली याचबरोबर नोव्हेंबरमध्ये G-20 शिखर परिषदेची सूचना करत अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवले. Prime Minister Narendra Modi announced the conclusion of the G20 summit with the presidency now going to Brazil
समारोपाच्या वेळी मोदी म्हणाले की, काल आम्ही एक पृथ्वी आणि एक कुटुंबाबद्दल बोललो. याबाबत सत्रात विस्तृत चर्चा झाली. आज G-20 हे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य यासंदर्भात आशावादी प्रयत्नांचे व्यासपीठ बनले आहे याचे मला समाधान आहे. येथे आपण अशा भविष्याबद्दल बोलत आहोत ज्यामध्ये आपण ग्लोबल व्हिलेजच्या पलीकडे जाऊ आणि ग्लोबल फॅमिली वास्तवात बनताना पाहू. असे भविष्य ज्यामध्ये केवळ देशांचे हीतच नाही तर मनं देखील जुडलेले आहेत.
मोदी म्हणाले, “भारताकडे नोव्हेंबरपर्यंत G-20 चं अध्यक्षपद आहे. यासाठी अद्याप अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसांत आपण सर्वांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव मांडले आहेत. प्राप्त झालेल्या सुचनांवर विचार करण्यात येईल, ही आमची जबाबदारी आहे. नोव्हेंबरच्या शेवटी G-20 चं एक व्हर्चुअल सेशन ठेवलं जाईल. या सेशनमध्ये दोन दिवसीय शिबिरात झालेल्या मुद्द्यांची समिक्षा केली जाईल. तुम्ही या सत्रांत सहभागी व्हाल अशी आशा करतो. यासह, मी परिषदेचा समारोप घोषित करतो.”
#WATCH | G 20 in India | Prime Minister Narendra Modi says, "…As you all know India has the responsibility of G20 presidency till November 2023. In these two days, all of you gave a lot of suggestions and placed proposals. It is our duty that the suggestions we have received be… pic.twitter.com/qvdoCyKnXq — ANI (@ANI) September 10, 2023
#WATCH | G 20 in India | Prime Minister Narendra Modi says, "…As you all know India has the responsibility of G20 presidency till November 2023. In these two days, all of you gave a lot of suggestions and placed proposals. It is our duty that the suggestions we have received be… pic.twitter.com/qvdoCyKnXq
— ANI (@ANI) September 10, 2023
दरम्यान भारताच्या नेतृत्वाखाली झालेल्या G20 परिषदेत जे अत्यंत महत्त्वाचे करार झाले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा करार भारत – पश्चिम आशिया – युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा ठरला. चीनच्या सिल्क रूटला टक्कर देणार हा “महामार्ग” ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more