केरळमधील पलक्कडमध्ये आज पंतप्रधान मोदींचा रोड शो

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. Prime Minister Modis road show today in Palakkad Kerala

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी केरळमधील पलक्कडमध्ये रोड शो करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ पंतप्रधान पठाणमथिट्टा येथे जाणार आहेत.

या भागातून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान मोदी त्यांचा प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा या वर्षातील हा पाचवा केरळ दौरा आहे. पंतप्रधान मोदी १५ मार्च ते १९ मार्चदरम्यान दक्षिण भारताच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये निवडणूक रॅली घेणार आहेत.

केरळमधील १५ मार्चच्या सभेत मोदी म्हणाले होते, “काँग्रेस आणि डाव्या पक्षांची परिस्थिती अशी आहे की, ज्या राज्यात ते निवडणूक हरले त्या राज्यात ते पुनरागमन करू शकत नाहीत. काँग्रेसने ज्या पद्धतीने खेळ केला. सत्तेच्या लालसेने राज्ये उध्वस्त केली. ज्या राज्यातून ते पराभूत झाले तेथील जनता त्यांना परत येऊ देत नाही.

Prime Minister Modis road show today in Palakkad Kerala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात