Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींनी रचला मोठा इतिहास; नेहरू अन् इंदिरा गांधींनाही मागे टाकले

Prime Minister Modi

पंतप्रधान मोदींच्या नावावर सर्वाधिक रेकॉर्ड आहेत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Prime Minister Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गयाना दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करतील. मोदी 14व्यांदा दुसऱ्या देशाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांसाठी हा विक्रम ठरला आहे.Prime Minister Modi

भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मोदींपूर्वी मनमोहन सिंग यांनी दुसऱ्या देशाच्या संसदेला सात वेळा संबोधित केले होते. इंदिरा गांधींनी दुसऱ्या देशाच्या संसदेला चार वेळा संबोधित केले, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तीन वेळा, अटलबिहारी वाजपेयी यांनी दोनदा आणि राजीव गांधी यांनीही दुसऱ्या देशाच्या संसदेला दोनदा संबोधित केले. पीव्ही नरसिंह राव आणि मोरारजी देसाई यांनी प्रत्येकी एकदा दुसऱ्या देशाच्या संसदेला संबोधित केले आहे.



2014 मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह आशियातील विविध देशांच्या संसदांना संबोधित केले आहे. मोदींनी आतापर्यंत दोनदा अमेरिकन संसद आणि काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले आहे. पहिल्यांदा 2016 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2023 मध्ये. 2014 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि फिजीच्या संसदेला संबोधित केले. 2015 मध्ये त्यांनी ब्रिटीश संसदेला संबोधित केले, 2015 मध्ये त्यांनी मॉरिशसच्या संसदेला संबोधित केले आणि 2018 मध्ये त्यांनी युगांडाच्या संसदेला संबोधित केले.याशिवाय पीएम मोदींनी नेपाळ, भूतान, मंगोलिया, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तानच्या खासदारांना एकत्र संबोधित केले आहे.

गयानाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित

पंतप्रधान मोदी एक दिवस आधीच गयानाला पोहोचले होते. येथे त्यांनी गयानाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांची भेट घेतली. मोदींची अलीसोबतची भेट अद्भूत असल्याचे सांगण्यात आले. गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली यांनी पंतप्रधान मोदींना गयानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ देऊन सन्मानित केले. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला गयानाचा सर्वोच्च सन्मान दिल्याबद्दल मी माझा मित्र इरफान अली याचे आभार मानतो. हा सन्मान फक्त माझा नसून 140 कोटी भारतीयांचा आहे, असे ते म्हणाले.

Prime Minister Modi created great history surpassed Nehru and Indira Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात