वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Cult of Fear डिस्कव्हरीने लोकांना दाखवलेल्या आसारामच्या ‘कल्ट ऑफ फिअर’ची कहाणी खुद्द कर्मचारीच अनुभवत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी प्लसचे कर्मचारी आसाराम समर्थकांच्या दहशतीमुळे भीतीखाली वावरत आहेत. भीतीदेखील अशी की १०० हून अधिक कर्मचारी कार्यालयात येत नाहीत आणि ते त्यांच्या घरातच बंदिस्त आहेत. कंपनीने पोलिसांत तक्रार केली, पण कारवाई न झाल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर माहितीपटाचे प्रसारण रोखण्यासाठी आसाराम समर्थक अनेक डावपेच अवलंबत असल्याचे काेर्टात दाखल कागदपत्रांवरून दिसून आले आहे.Cult of Fear
जारी करावी लागली मार्गदर्शक तत्त्वे… सार्वजनिक ठिकाणी तुमची ओळख उघड करणे टाळा : डिस्कव्हरी इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीचे ओळखपत्र कार्यालयाबाहेर वापरू नये, असे सांगितले आहे. सोशल मीडिया खात्यांवरील बायोमधून कंपनीचे नाव काही काळ काढून टाका. एकट्याने प्रवास करू नका. सार्वजनिक ठिकाणी आसाराम किंवा कंपनीबद्दल चर्चा करणे टाळा. सोशल मीडियावर कंपनीशी संबंधित असभ्य टिप्पण्यांना प्रतिसाद देऊ नका. आंदोलने, मोर्चे अशा ठिकाणी जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा, अशा सूचना देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App