वृत्तसंस्था
डेहराडून : Kailash Yatra चीनच्या ताब्यात असणाऱ्या तिबेटमधील भागात कैलास मानसरोवर यात्रेची तयारी सुरू झाली आहे. २०१९ पासून ही यात्रा बंद होती. यात्रेसाठी भारतीयांचा पहिला जथ्था जूनच्या पहिल्या आठवड्यात रवाना होऊ शकतो. चीनशी यात्रेबाबत सहमती बनताच परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तराखंड सरकार यांच्यात पहिली बैठक झाली. सरकारी सूत्रांनुसार, या यात्रेत अनेक बदल दिसतील. नवी दिल्लीहून निघाल्यानंतर यात्रेकरूंचा पहिला मुक्काम ३३० किमी दूर टनकपूर येथे असेल. आधी हल्द्वानीत होता. दुसरा, नवी दिल्ली ते लिपुलेखपर्यंत गाडीने प्रवास असेल. लिपुलेखच्या दुसऱ्या बाजूने चीन सीमा सुरू होते. तेथे सपाट जागा असल्याने दुपदरी रस्ता झाला आहे. तेथून बसने यात्रेकरू कैलासला जातील.Kailash Yatra
पिथोरागडचेे पर्यटन अधिकारी कीर्तिराज आर्य यांनी सांगितले की, यात्रेची तयारी सुरू झाली आहे. या वेळी धारचुला ते तवाघाट होऊन लिपुलेखच्या आधी ३० किमीवरील गुंजी गावात पोहोचता येईल. आधी ८ दिवस लागत. म्हणजे दिल्लीहून चौथ्या वा पाचव्या दिवशी तुम्ही कैलास क्षेत्रात असाल. एवढाच वेळ परतीच्या प्रवासासाठी लागेल. आधी २४ दिवसांची असलेली ही यात्रा आता १० दिवसांतच पूर्ण होईल.
लिपुलेखच्या मार्गाचा उल्लेख स्कंद पुराणात..
भारतातून कैलास यात्रेसाठी तीन मार्ग आहेत. पहिला सिक्किमच्या नाथुलाहून ८०२ किमी दीर्घ मार्ग. दुसरा, लिपुलेख. येथेून कैलास फक्त ६५ किमी आहे. तिसरा – नेपाळ मार्गे. जो काठमांडूहून ४०० किमी दूर आहे. स्कंद पुराणातील मानस खंडात कूर्मांचल पर्वाच्या ११ व्या अध्यायात लिपुलेखचा उल्लेख आहे. कैलास मार्ग उत्तराखंडच्या शारदा वा काली नदीच्या किनाऱ्यावरून जातो, असे त्यात म्हटले आहे.
२४ नव्हे, तर १० दिवसांचाच असेल प्रवास
२०१९ मध्ये काय होते? : नवी दिल्ली ते हल्द्वानी, त्यानंतर धारचुलाहून तवाघाटचा प्रवास गाडीने व्हायचा. त्यानंतर गुंजी आणि लिपुलेखपर्यंत ९५ किमी प्रवास दुर्गम डोंगररांगातून. हे ८ दिवस पायी मार्गक्रमण. कैलासला जाण्या- येण्यासाठी २३ रात्री बुदी, मालपा, गुंजी, कालापानी, नाभीढांगमध्ये घालवाव्या लागत असत.
२०२५ मध्ये काय होईल? नवी दिल्लीहून सकाळी ७ वाजता प्रस्थानानंतर रात्री ८ पर्यंत टनकपूरला पोहोचता येईल. येथे रात्रीचा मुक्काम. पुढच्या दिवस सायंकाळपर्यंत धारचुलात. तिसऱ्या दिवशी थेट गुंजी आणि चौथ्या तिबेटमध्ये. तेथे एक दिवस थांबून याच मार्गे माघारी. या प्रवासात ८ वा ९ रात्री जातील. बुदी, गुंजी, नाभीढांग आणि लिपुलेखमध्ये प्रत्येक मोसमात थांबता येणारे तंबू-होमस्टे असतील. तेथे जेवण, उबदार कपडे, गाड्या उपलब्ध.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App