प्रतिनिधी
मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची “वर्षा”वर भेट झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दीड – दोन मिनिटांत आपली निवेदने सांगितली. पण त्यानंतर अपेक्षित असलेली प्रश्न-उत्तरे झालीच नाहीत. त्यामुळे पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरे का झाली नाहीत??, याची चर्चा सोशल मीडिया वर सुरू झाली आणि एक व्हिडिओ याबाबत व्हायरल झाला.Press Council Thackeray – KCR; Discussion:To run away from the questions and answers of “Rokhthok” Raut
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांच्या शेजारी बसले होते. पत्रकार परिषद सुरू करण्याचे निवेदन त्यांनी केल्यानंतर ते खाली बसले आणि चंद्रशेखर राव यांच्या कानात काहीतरी पुटपुटले… मात्र ही पुटपूट तिथल्या माइकने बरोबर कॅच केली…!! “नो क्वेश्चन – आन्सर्स” असे संजय राऊत चंद्रशेखर राव यांच्या कानात फुटल्याचे ऐकू आले. चंद्रशेखर राव यांनी देखील त्यांना होकार भरल्याचे दिसले.
हा व्हिडीओ पत्रकार परिषदेनंतर जोरदार व्हायरल झाला आहे. एरवी सामनामध्ये “रोखठोक” लिहून भल्याभल्यांना पाणी पाजणारे संजय राऊत पत्रकार परिषदांमध्ये प्रश्नोत्तरांना का घाबरतात…??, असा सवाल सोशल मीडियावर करण्यात येऊ लागला आहे. संजय राऊत यांनी तीनच दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर देखील प्रश्न – उत्तरे होतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यांनी आपले निवेदन संपल्यानंतर प्रश्नोत्तरे घेण्याचे टाळले आणि ते निघून गेले.
आज देखील के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरे होणे अपेक्षित असताना “नो क्वेश्चन – आन्सर्स” म्हणून संजय राऊत यांनी प्रश्नोत्तरे का टाळली?? संजय राऊत प्रश्न उत्तर यांना घाबरत असतील पण दोन मुख्यमंत्री देखील पत्रकारांची प्रश्न उत्तरे करायला घाबरतात का…??, असे खोचक सवाल सोशल मीडियातून करण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App