मोदींविरोधात प्रादेशिक एकी; पण काँग्रेसची निरगाठ सोडवणार कशी…?? – देशाच्या “राजकीय तलावात” प्रादेशिक नेत्यांचे कडेकडेनेच पोहणे..


केंद्रातल्या भाजपा सरकार विरोधात सर्वच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना एकत्र यायचे आहे. त्यासाठी भेटीगाठी देखील सुरू आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन “वर्षा”वरील या पत्रकार परिषदेत प्रादेशिक पक्षांच्या ऐक्याची आज सुरुवात होत आहे, असे जरी म्हटले असले तरी ही ऐक्याची सुरुवात आज झालेली नाही.Regional unity against Modi; But how to solve the problem of Congress Regional leaders swimming side by side in the “political pool” of the country.

ही सुरुवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः करून दिली आहे. परंतु केसीआर यांनी हे “श्रेय” त्यांना दिले दिसले नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातून प्रेरणा घेऊन या ऐक्याला सुरुवात होत असल्याचे वक्तव्य त्यांनी करून एक प्रकारे ममता बॅनर्जी यांना “डिस्क्रेडिट” करण्याचा प्रयत्न देखील केल्याचे दिसून येत आहे.



पण प्रादेशिक पक्षांचा ऐक्याचा मुद्दा थोडासा त्या पलिकडचा देखील दिसत आहे. के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, एम. के. स्टालिन हे आपापल्या प्रांतांमध्ये प्रबळ असलेले नेते अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राष्ट्रीय पातळीवर “थेट पंगा” घेण्याचे टाळताना दिसत आहेत. आपापल्या राज्यांमध्ये ते भाजप नेतृत्वाशी जोरदार पंगा घेतात, पण थेट केंद्र सरकारवर राष्ट्रीय पातळीवर हल्लाबोल करण्यासाठी जी घुसून ताकद लावावी लागते, तशी लावताना मात्र दिसत नाहीत…!! उलट अजूनही हे सर्व नेते देशाच्या “राजकीय तलावात” किनार्‍या – किनार्‍याने पोहताना दिसतात…!!

सर्व प्रादेशिक नेत्यांच्या तोंडची भाषा “फेडरल सिस्टीम”, “देशाची परिस्थिती”, “सूडाचे राजकारण”, “प्रगतीची दिशा” वगैरे जरी असली तरी आपापल्या राज्यातली राजकीय प्रतिष्ठा जपणे आणि सत्ता जपणे याखेरीज त्यांचे उद्दिष्ट त्या पलिकडे गेलेले खऱ्या अर्थाने दिसत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी देखील के. चंद्रशेखर राव यांनी 2019 मध्ये असाच प्रादेशिक पक्षांच्या ऐक्याचा प्रयत्न करून बघितला होता. पण त्यावेळी त्यांना फारसा कोणी प्रतिसाद दिला नाही. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा मोदी विरुद्ध ममता ही फाईट शिगेला पोहोचली त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीची चर्चा सुरू झाली. ममता बॅनर्जींचा देशव्यापी दौराही झाला आणि त्यानंतर आज के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रादेशिक पक्षांच्या ऐक्याचे समांतर प्रयत्न सुरू केले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई भेटीत शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळेस सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये त्यांच्याबरोबरच उभे राहून त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए राजकीय अस्तित्वच पुसून टाकले होते. आज चंद्रशेखर राव यांनी निदान तसे काही “वर्षा” बंगल्यावर केलेले दिसले नाही. उलट काँग्रेस पक्षाच्या मुद्द्यावर थेट भाष्य करणे चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी टाळले.

काँग्रेसची निरगाठ सोडवणार कशी…??

प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीत काँग्रेसला काही स्थान असेल का? की काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांचे ऐक्य साधले जाईल?, हा नाजूक प्रश्न आहे आणि ती निरगाठ सोडवणे प्रादेशिक पक्षांना फार कठीण आहे. राहुल गांधींचे नेतृत्व काँग्रेस मध्ये आल्यास निरगाठ आपोआप सुटेल, पण सोनिया गांधींचे नेतृत्व कायम राहिल्यास 2024 पर्यंत ही निरगाठ सुटणे फार अवघड आहे. त्यामुळेच के. चंद्रशेखर राव असोत की उद्धव ठाकरे असोत किंवा अन्य प्रादेशिक पक्षांचे नेते असोत काँग्रेस बद्दल थेट भाष्य करणे ते टाळत आहेत. याला अपवाद फक्त ममता बॅनर्जी यांचा आहे. पण एकूणच ममता बॅनर्जी सोडून बाकीचे सगळे प्रादेशिक नेते देशाच्या “राजकीय तलावात” कडेकडेने पोहताना दिसत आहेत…!!

Regional unity against Modi; But how to solve the problem of Congress Regional leaders swimming side by side in the “political pool” of the country.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात