कोट्यवधी उभे करण्याचे आहे लक्ष्य
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळी देशातील आघाडीच्या राजकीय रणनीतीकारांपैकी एक असलेले प्रशांत किशोर आता राजकारणी बनले आहेत. जन सूराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर ( Prashant Kishor )यांनी 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करण्याची आणि निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
त्याचवेळी, आता प्रशांत किशोर यांनीही निवडणूक लढवण्यासाठी देणग्यांबाबत आपली योजना उघड केली आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, त्यांचा पक्ष निवडणुकीसाठी बिहारमधील जनतेकडून प्रत्येकी 100 रुपयांची देणगी मागणार आहे.
नवीन पक्षासाठी संसाधने वाढवण्याच्या योजनेच्या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी सांगितले की जन सूराजसाठी विकेंद्रित देणगी पद्धतीचा अवलंब करू. देणगीतून किमान 200 कोटी रुपये उभे करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जन सूराज राज्यभरातील दोन कोटी लोकांकडून प्रत्येकी 100 रुपयांच्या तुटपुंज्या देणग्या मागणार असल्याचे सांगून लोक देणगी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अवैध दारू व्यवसाय आणि वाळू उत्खननात गुंतलेल्या माफियांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर आपण अवलंबून राहू शकत नाही, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही लोकांना 100 रुपये देणगी देण्यास सांगू जेणेकरुन जेव्हा जन सूराज पुढचे सरकार बनवेल तेव्हा भ्रष्टाचाराच्या मुळांवर हल्ला होईल आणि सेवांसाठी लाच देणे आता भूतकाळातील गोष्ट होईल. अशाप्रकारे निवडणुकीपर्यंत 200 कोटींहून अधिक रक्कम जमवता येईल, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App