प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी मिशन 2024 संदर्भात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 4 तासांचे सादरीकरण केले. पीके यांनी सादरीकरणात सांगितले की, पक्षाने ओडिशा, बिहार आणि यूपीमध्ये ‘एकला चलो’चे धोरण स्वीकारताना लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, महाराष्ट्र, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इतरांशी आघाडी केली पाहिजे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणाशी सहमत आहेत.Prashant Kishor formula to revive the Congress says to Fight on its own in Bihar-UP and To Form Alliance in Maharashtra-Bengal
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी मिशन 2024 संदर्भात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 4 तासांचे सादरीकरण केले. पीके यांनी सादरीकरणात सांगितले की, पक्षाने ओडिशा, बिहार आणि यूपीमध्ये ‘एकला चलो’चे धोरण स्वीकारताना लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, महाराष्ट्र, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इतरांशी आघाडी केली पाहिजे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणाशी सहमत आहेत.
1. काँग्रेसने 370 जागांवर लक्ष केंद्रित करावे
बैठकीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सुचवले की, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण 543 जागांपैकी केवळ 370 जागांवर लक्ष केंद्रित करावे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि गुजरातमधील बहुतांश जागांचा समावेश आहे.
2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या. 210 जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच देशात लोकसभेच्या 262 जागा अशा आहेत, जिथे काँग्रेसची थेट भाजपशी लढत होती. याशिवाय, 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस 350 जागांवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आली होती. पीके यांनी या आधारावर 370 जागांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली.
2. बिहार-यूपी आणि ओडिशामध्ये स्वबळावर लढायचं
बिहार, यूपी आणि ओडिशामध्ये काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवावी, अशी आणखी एक मोठी सूचना प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात काँग्रेसला केली. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 140 जागा आहेत. राजकीय वर्तुळात यूपी-बिहारमधून दिल्लीला जाण्याचा प्रघात प्रचलित आहे.
3. बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडी करायची
प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात काँग्रेसला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मजबूत आघाडी करण्याचा सल्ला दिला. या राज्यांमध्ये लोकसभेच्या 139 जागा आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत काँग्रेस आघाडीत सहभागी आहे.
प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशावर निर्णय लांबणीवर
प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणानंतर काँग्रेसने एके अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अंबिका सोनी यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत उपस्थित नेत्यांनी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले आहे. मात्र, ते कोणत्या पदावर काम करणार यावर सस्पेन्स कायम आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App