‘’जनता दल युनायटेड नावाच्या पक्षाचा शेवटचा काळ चालू आहे, नितीश कुमार यांनीच केले क्रियाकर्म’’

Prashant kishor and nitish kumar new

प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा;  म्हणाले मी लिहून देतो…

विशेष प्रतिनिधी

समस्तीपूर : राजकीय रणनितीकार आणि जन सूरज पदयात्रा काढणारे प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. प्रशांत किशोर म्हणाले की, मी नितीशकुमार यांच्या राज्याबाहेरील दौऱ्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही.  Prashant Kishor criticizes Nitish Kumar

ते म्हणाले, ‘तुम्ही माझे बंगालबाबतचे ट्विट पाहिले असेल, भारतीय जनता पक्षाला 100 जागा मिळणार नाहीत, असे मी म्हटले होते. त्याचप्रमाणे आता  नितीश कुमार यांनी काहीही केले तरी त्यांच्या जदयूला पाच जागाही मिळणार नाहीत. मी लिहून देतो, जदयूचे जमिनीवर काहीच अस्तित्व नाही.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, ‘जर संघटना नसेल, नेता नसेल, प्रतिमा नसेल, तर जेडीयूला मत कोण देणार? निवडणूक अद्याप बरीच दूर आहे, मी आत्ताच प्रत्येकाबद्दल सांगू शकत नाही. मात्र जेडीयूला आता भविष्य नाही. जनता दल युनायटेड नावाच्या पक्षाचा शेवटचा काळ चालू आहे, त्या पक्षात काही गडबड आहे म्हणून नाही तर नितीश कुमार यांनीच आपल्या पार्टीचे क्रियाकर्म केले आहे. त्यांना आता जेडीयूची गरज नाही. त्यांना फक्त एवढेच हवे आहे की आपण मुख्यमंत्री राहावे मग पक्षाचे काहीही झाले तरी चालेल.

Prashant Kishor criticizes Nitish Kumar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub