विशेष प्रतिनिधी
पुणे : बड्या बापाच्या बेट्याने दारू पिऊन पोर्शे कार चालवून दोन इंजिनीअर्सचे बळी घेतले. यातल्या मुख्य आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवालचे पवारांशी संबंध असल्याचे उघड्यावर आल्यानंतर या प्रकरणाला भरपूर राजकीय धुमारे फुटले. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. Prakash Ambedkar refusal to speak on Ajit pawar
बिल्डर विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरविला??, विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे??, याचा खुलासा झाल्यास विशाल अग्रवालला वाचवणारी नावे समोर येतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते अकोल्यात बोलत होते. बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात नवा कायदा जोपर्यंत होत नाहीय तोपर्यंत अशी प्रकरण घडतच राहतील. याप्रकरणात सध्या अजितदादांवर होत असलेल्या आरोपांवर काहीही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही एकच केस नाही, अशा अनेक केस आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणारा डॉ. जोंधळे यांनाही असं फरपटत नेलं. डॉ. जोंधळेंचे नावच कुठेही येत नाही, त्यांनाही असे मारण्यात आले. त्यामुळे असे मानतो की, त्याच्या मागे राजकारण जे काही असेल पण हा वाहनचालकांचा निष्काळजीपण आहे, त्यालाही कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे. कारण आई- बापांचा मुलांवर कोणतेच नियंत्रण राहिले नाही. असे एकंदरीत दिसते . त्यामुळे कडक कायदा येणे आवश्यक आहे. अल्पवयीन असो की प्रौढ त्यासंदर्भात कडक कायदा येत नाही, या प्रकाराला आळा बसणार नाही.
विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे??, अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरविला??, याचा खुलासा झाला तर त्याला वाचवणारी सर्वच नाव समोर येणार आहेत. अजित पवारांवरील आरोपांवर सध्या काहीच बोलणार नाही. सध्या पोलीस सांगतात त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.
पुणे अपघाताची घटना ‘एआय’द्वारे जिवंत करणार
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अपघाताची घटना ‘एआय’द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. रॅश ड्रायव्हिंग अपघातातील दोषीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलीस भर देत आहेत. ‘एआय’मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App