प्रज्वल रेवण्णाच्या लैंगिक चाळ्यांचे व्हिडिओ कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांकडे 3 महिने नुसते पडून!!; प्रज्वलच्या ड्रायव्हरचाच खुलासा

Prajwal Revanna’s driver has disclosed that DK Shivkumar, Congress DCM in Karnataka

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि खासदार प्रज्वल रेवण्णा याने केलेल्या लैंगिक छळाचा व्हिडिओचा पेन ड्राईव्ह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे गेल्या 3 महिन्यांपासून नुसता पडून होता. त्याबद्दल त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही किंवा तो मुख्यमंत्र्यांनाही दाखविला नाही, असा धक्कादायक खुलासा प्रज्वल रेवण्णा प्रकरणातून समोर आला आहे. Prajwal Revanna’s driver has disclosed that DK Shivkumar, Congress DCM in Karnataka

प्रज्वल रेवण्णा याचा ड्रायव्हरनेच हा धक्कादायक खुलासा केल्याने एकूणच प्रकरणाला पूर्ण वेगळे वळण लागले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी देवेगौडांचा जीडीएस आणि भाजप यांच्यावर त्याबद्दल प्रश्नचिन्ह लावले होते. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे या प्रकरणातले स्पष्ट मत मांडून प्रियांका गांधींवरच त्यांची बाजू उलटवली. इतकेच नाहीतर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आत्तापर्यंत प्रज्वल रेवण्णा याच्यावर कारवाई का केली नाही??, असा खडा सवाल केला. त्या पाठोपाठ प्रज्वल रेवण्णा याच्या ड्रायव्हरचा खुलासा समोर आला. प्रज्वलने जेवढ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केले, त्या संदर्भातले व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह 3 महिन्यांपासून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे नुसता पडून राहिला असे प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरने सांगितले.

या पार्श्वभूमीवर भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी एक मोठे ट्विट करून कर्नाटक सरकारच्या कारवाईतल्या ढिलेपणावर प्रकाश टाकला आहे त्याचबरोबर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

अमित मालवीय (मोदी का परिवार) म्हणतात :

@amitmalviya प्रज्वल रेवण्णा यांच्या ड्रायव्हरने खुलासा केला आहे की, कर्नाटकातील काँग्रेसचे डीसीएम डी. के. शिवकुमार यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी प्रज्वलच्या कारनाम्यांचे व्हिडिओ असलेला पेन ड्राइव्ह होता. त्यामुळे भाजपला प्रश्न विचारण्यापूर्वी काँग्रेसने पुढील उत्तरे दिली पाहिजेत.

– एवढ्या महिन्यात डी. के. शिवकुमार यांनी पेन ड्राइव्हबद्दल काय केले?

– त्यांनी हे प्रकरण सीएम सिद्धरामय्या यांना कळवले का? त्यावर सिद्धरामय्या यांनी काय केले?

– कर्नाटकातील काँग्रेस सरकारने प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई का केली नाही? शेवटी कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे.

– प्रियंका वाड्रा यांनी सिद्धरामय्या किंवा डीके यांना विचारले का, की त्यांनी हे व्हिडिओ सार्वजनिक का केले, पण प्रज्वलच्या विरोधात कारवाई का केली नाही?

सत्य हे आहे : प्रज्वल रेवण्णाच्या वासनेला बळी पडलेल्या महिलांच्या दुःखावर काँग्रेसने पुन्हा एकदा राजकारणाला प्राधान्य दिले, हे लांछनास्पद आहे.

Prajwal Revanna’s driver has disclosed that DK Shivkumar, Congress DCM in Karnataka

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात