विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना आज मरणोत्तर भारतरत्न किताब प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यात प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनाही मरणोत्तर भारतरत्न किताब प्रदान करण्यात आला. Posthumously awarded Bharat Ratna to Narasimha Rao
राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्व महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा देखील समावेश होता. परंतु, नेहमीप्रमाणे गांधी परिवार हजर राहिला नाही.
नरसिंह राव, स्वामीनाथन, चरणसिंह आणि कर्पुरी ठाकूर यांच्या राजकीय, वैज्ञानिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न किताब जाहीर केला होता. त्याचा प्रदान समारंभ आज राष्ट्रपती भवनात झाला. या कार्यक्रमाचे निमंत्रण गांधी परिवाराला होते. परंतु, गांधी परिवार या सोहळ्याला हजर राहिला नाही.
माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना देखील केंद्र सरकारने भारतरत्न किताब दिला होता. तो सोहळा देखील राष्ट्रपती भवनात झाला होता. मात्र त्यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाकीचे सर्व नेते सोहळ्याला हजर होते, पण गांधी परिवार त्या सोहळ्याला देखील हजर राहिला नव्हता.
भारतरत्न नावाचा किताब गांधी परिवारापलीकडे कोणाला मिळू शकतो यावर विश्वास नसल्याने गांधी परिवार अशा किताब प्रदान सोहळ्यास उपस्थित राहात नसल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आधीपासून होतीच, ती गांधी परिवाराने आजही प्रत्यक्ष कृतीतून खरी करून दाखवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App