political Drama : जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत उमेदवारीवरून सुरू झालेले ‘राजकीय नाट्य’ माघार घेईपर्यंत सुरू होते. येथे नामनिर्देशित होण्यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य ममता आपल्या पतीसमवेत राष्ट्रीय लोकदल (रालोद) सोडून भाजपामध्ये गेल्या. तथापि, काही तासांनंतर त्यांचे रालोद प्रेम पुन्हा जागृत झाले आणि त्या पुन्हा रालोदमध्ये परत आल्या. यानंतर जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी रालोदच्या वतीनेही नामांकन देण्यात आले. मंगळवारी नामांकन होते, पण जिल्हाधिकारी कार्यालयात जे काही घडले, ती घटना पूर्णपणे फिल्मी ठरली. political Drama In Zilla Panchayat Election in Baghpat, Fake Candidate traying to take back nomination
विशेष प्रतिनिधी
बागपत : जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत उमेदवारीवरून सुरू झालेले ‘राजकीय नाट्य’ माघार घेईपर्यंत सुरू होते. येथे नामनिर्देशित होण्यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य ममता आपल्या पतीसमवेत राष्ट्रीय लोकदल (रालोद) सोडून भाजपामध्ये गेल्या. तथापि, काही तासांनंतर त्यांचे रालोद प्रेम पुन्हा जागृत झाले आणि त्या पुन्हा रालोदमध्ये परत आल्या. यानंतर जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी रालोदच्या वतीनेही नामांकन देण्यात आले. मंगळवारी नामांकन होते, पण जिल्हाधिकारी कार्यालयात जे काही घडले, ती घटना पूर्णपणे फिल्मी ठरली.
दुपारी तीन महिला एका युवकासह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. एका महिलेने स्वत:ला रालोद उमेदवार ममता आणि इतर दोन महिलांनी स्वत:ला प्रस्तावक असल्याचे सांगून जिल्हा पंचायत अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेत असल्याचे सांगितले. आपण कोण आहात हे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले असता महिलेने उत्तर दिले की, त्या रालोदच्या जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या उमेदवार ममता आहेत आणि स्वत:च्या इच्छेने उमेदवारी मागे घेत आहेत. यानंतर माघारीचा फॉर्म दिल्यानंतर या तिन्ही महिला आणि तरुण घाईघाईने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले आणि कारमध्ये स्वार होऊन निघून गेले.
दुसरीकडे, रालोद नेत्यांना जेव्हा हे कळले तेव्हा खळबळच उडाली, कारण ती महिला ही खरी ममता नव्हती. खऱ्या ममता या त्यांचे पती जयकिशोर आणि रालोदचे जिल्हाध्यक्ष डॉ. जगपालसिंग तियोतिया यांच्यासह राजस्थानमधील भरतपूर येथील एका हॉटेलमध्ये होत्या. बागपतमधील बनावट ममताशी संबंधित घटनेची माहिती मिळताच, भरतपुरातील खऱ्या ममतांनी लगेच मास्क न घातल्याच्या दंडाची पावती फाडली. त्या पावतीच्या आधारे त्या राजस्थानात असल्याची माहिती देऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि परिस्थिती सांगितली. यानंतर ममतांनी इंटरनेटवर थेट व्हिडिओ व्हायरल करून बनावट ममताचा भंडाफोड केला. यानंतर माजी आमदार वीरपाल राठी, विश्वास चौधरी, कुलदीप उज्ज्वल आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि गोंधळ करून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. रालोद नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनाही कलेक्टर आफिसमध्ये येण्याविषयी सांगितले, परंतु ते आले नाहीत. येथे गोंधळ वाढत असल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रालोद नेते विश्वास चौधरी यांना सायंकाळी 3.30 वाजता चर्चेसाठी बोलावले आणि खऱ्या ममतांची उमेदवारी पुन्हा बहाल केल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले. बबली देवी येथून भाजपच्या उमेदवार आहेत.
बागपतचे जिल्हाधिकारी राजकमल यादव यांनी म्हटले की, नामांकन मागे घेण्यासाठी आलेल्या अज्ञात ममता तपासात बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासनाने माघारीचा फॉर्म स्वीकारला नाही. जेव्हा मी खर्या ममतांशी फोनवर बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्या भरतपूरमध्ये आहेत आणि त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. रालोदच्या ममता यांची उमेदवारी पूर्ववत झाली आहे.
political Drama In Zilla Panchayat Election in Baghpat, Fake Candidate traying to take back nomination
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App