वृत्तसंस्था
मालेगाव : त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे निमित्त करून मालेगाव, मनमाड, अमरावती नांदेड मध्ये रझा अकादमीने मोर्चे काढून काढले. या मोर्चामध्ये दगडफेकही झाली या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांनी गस्त वाढविली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचे नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.Police is taking action in connection with the incident that took place this evening
मालेगावात रात्रीची पोलिसांची गस्त सुरू झाली असून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पोलिसांच्या गस्तीच्या वेळी कुठलीही संशयास्पद हालचाल आढळली तरी देखील ताबडतोब कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
– मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये पोलिसांवर दगडफेक,
त्रिपुरा येथे अल्पसंख्यांकावरील कथित अन्याय तसेच उत्तर प्रदेशात एका राजकीय नेत्याने केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून आज मालेगाव तसेच नाशिक शहरात बंद पुकारण्यात आला होता. नाशिकला बंद शांततेत पार पडला. मात्र मालेगावला काही कार्यकर्त्यांमुळे बंदला गालबोट लागले. तसेच अमरावती आणि नांदेडमध्येही मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
Police is taking action in connection with the incident that took place this evening. It's peaceful in Malegaon right now. Regular patrolling has begun. I'd like to tell people to not spread rumours otherwise action will be taken: Sachin Patil, Nashik SP on violence in Malegaon pic.twitter.com/Zgavci0e5C — ANI (@ANI) November 12, 2021
Police is taking action in connection with the incident that took place this evening. It's peaceful in Malegaon right now. Regular patrolling has begun. I'd like to tell people to not spread rumours otherwise action will be taken: Sachin Patil, Nashik SP on violence in Malegaon pic.twitter.com/Zgavci0e5C
— ANI (@ANI) November 12, 2021
यासंदर्भात रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमा यांनी बंद पुकारला होता. बंदला मालेगाव शहरात गालबोट लागले. बंदचे आवाहन करणाऱ्या जमावाने सुरवातीला चहा टपरी, हॉटेल व बसस्थानक परिसरात बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी तणाव वाढल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस व जमाव समोरासमोर आला. जमावातील काही कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेऊन दगडफेक केली. त्यामुळे शहराच्या पुर्व भागात सध्या तणावपुर्ण शांतता आहे.
यासंदर्भात अपशब्द वापरणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी. अल्पसंख्यांक शहराच्या पुर्व भागातील रिक्षा, पॉवरलुम, विविध बाजारपेठा, व्यवसाय पुर्णपणे बंद होते. दुध व मेडीकल वगळता बहुतांश व्यवहार बंद होते.
अमरावती, नांदेडमध्येही रझा अकादमीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. त्यावेळी घोषणाबाजी झाली आणि काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाली. त्रिपुरातील घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रात हिंसाचार घडविणार्यांना कायदेशीर कारवाई करून जरब बसवा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App