विशेष प्रतिनिधी
लखनौ – नागरिकांना राज्यातील नद्यांमध्ये मृतदेह टाकण्यापासून रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सशस्त्र पोलिसांनी गस्त घालण्याचा आदेश दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून गंगेतील मृतदेह कोविड रुग्णांचे असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Police force deployed on ganaga river bank
यासाठी गावातील प्रमुखांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ते म्हणाले, की मृतदेहांवर आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले जायला हवेत. राज्य सरकारने अंत्यसंस्कारासाठी यापूर्वीच निधी मंजूर केला आहे.
मात्र, केवळ धार्मिक परंपरेमुळे कुणालाही गंगा नदीत मृतदेह टाकण्याची परवानगी देऊ नये. तसे करणाऱ्यांना गरज भासल्यास स्थानिक स्तरावर दंड ठोठवावा. मनुष्य व प्राण्यांच्या मृतदेहांमुळे नद्या प्रदूषित होत आहे. राज्यातील नद्या स्वच्छ करण्यासाठी सरकार विशेष मोहीम चालवत आहे. गृह, नागरी आणि ग्रामीण विकास विभागांनीही यांसदर्भात धोरण तयार करावे.
नदीमध्ये मृतदेह आढळत असल्यावरून उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. हा प्रकार अमानवी, गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App