PoK स्वतःहून भारतात सामील होईल, थोडी वाट पाहा; जनरल व्ही. के. सिंह यांचे सूचक उद्गार


वृत्तसंस्था

जयपूर : PoK अर्थात पाकिस्तान व्याप्त काश्मीर स्वतःहून भारतात सामील होईल. थोडी वाट पाहा, असे सूचक उद्गार केंद्रीय मंत्री आणि भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी काढले. राजस्थानात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. PoK will join India on its own

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. तिथल्या जनतेनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपल्याला भारतात सामील होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी तिथे मोठमोठी आंदोलने होत आहेत. या संदर्भातला प्रश्न एका पत्रकाराने जनरल सिंह यांना विचारला. त्यावेळी त्यांनी PoK स्वतःहून भारतात सामील होईल. थोडी वाट पाहा, असे सूचक उद्गार काढले.

जनरल व्ही. के. सिंह यांचे उद्गार कोणा एका केंद्रीय मंत्र्याचे केवळ राजकीय उद्गार नाहीत. ते भारताचे माजी लष्कर प्रमुख आहेत. त्यामुळे पाकिस्तानल्या अंतर्गत घडामोडी तसेच भारतीय व्यूहरचना याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी एका वाक्यात त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

पाकिस्तानात बलुचिस्तान सिंध आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर या तीन प्रांतांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि पाकिस्तानी सरकार विषयी, तिथल्या पंजाबी मुस्लिम वर्चस्ववादी राजवटी विषयी प्रचंड संताप आहे. पाकिस्तानची सर्व राजकीय, आर्थिक व्यवस्था पंजाबी मुस्लिमांनी बिघडवल्याचा या तिन्ही प्रांतांमधल्या नेत्यांचा आरोप आहे. पंजाबी मुस्लिम वर्चस्ववादी व्यवस्था पाकिस्तानातल्या इतर सर्व प्रांतांचे शोषण करते. त्यामुळे या तिन्ही प्रांतांना पाकिस्तानचे अस्तित्वच नको आहे. हे सर्व प्रांत एकतर स्वतंत्र होऊ इच्छितात किंवा त्यांना भारतात विलीन व्हायचे आहे.

या पार्श्वभूमीवर जनरल व्ही. के. सिंह यांच्यासारख्या माजी लष्करप्रमुखांनी PoK स्वतःहून भारतात विलीन होईल. थोडी वाट पाहा, असे वक्तव्य करणे विशेष महत्त्वाचे आहे.

PoK will join India on its own

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!