PNB Scam Accused Mehul Choksi Gone missing : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार घोषित करण्यात आलेले मेहुल चोकसी बेपत्ता झाले आहेत. चौकसींचे वकील विजय अग्रवाल म्हणाले की, त्यांचे कुटुंब चिंतेत आहे आणि त्यांनी मला भेटायला सांगितले आहे. अँटिगुआ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. PNB Scam Accused Mehul Choksi Gone missing, antigua police searching For Him Says His Lawyer Vijay Aggarwal
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार घोषित करण्यात आलेले मेहुल चोकसी बेपत्ता झाले आहेत. चौकसींचे वकील विजय अग्रवाल म्हणाले की, त्यांचे कुटुंब चिंतेत आहे आणि त्यांनी मला भेटायला सांगितले आहे. अँटिगुआ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मेहुल चौकसी हे आरोपी नीरव मोदी यांचे मामा आहेत. पीएनबीची 13,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी नीरव मोदी हे आणखी एक मुख्य आरोपी आहेत. चौकसी भारतातून पळून गेले होते आणि तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार ते अँटिगुआ आणि बार्बुडा येथे राहत आहेत. तर नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात कैदेत आहे.
मार्चमध्ये अँटिगुआ आणि बार्बुडा यांनी कॅरिबियन नेशन्स इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम (सीआयपी) अंतर्गत मेहुल चौकसी यांना दिलेले नागरिकत्व रद्द केल्याच्या बातम्या आल्या. परंतु मेहुल चौकसींच्या वकिलाने हे वृत्त फेटाळून लावत म्हटले की, चौकसी अँटिगुआचा नागरिक आहे आणि त्यांचे नागरिकत्व मागे घेतलेले नाही.
अँटिगुआ आणि बार्बुडाच्या वतीने मेहुल चोकसी यांचे नागरिकत्व रद्द केल्याच्या वृत्तावर त्यांचे वकील विजय अग्रवाल म्हणाले की, माझे क्लायंट मेहुल चोकसी अँटिगुआचे नागरिक आहेत. त्यांचे नागरिकत्व मागे घेतलेले नाही.
अनेक बँकांनी मेहुल चोकसींची कंपनी गीतांजली जेम्सकडे 5071 कोटी रुपयांचा एनपीए आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोकसी विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत अव्वल आहेत. चोकसी भारतातून पळून गेले होते आणि तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार तो कॅरिबियन देशात अँटिगामध्ये राहत आहे. जतिन मेहता यांच्या विनसम डायमंड्स अँड ज्वेलरीचे 3098 कोटींचे कर्ज बँकांनी बुडीत खात्यात टाकले आहे.
नुकतेच पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील फरार व्यावसायिक मेहुल चोकसी यांच्या छाप्यात एनफोर्समेंट डायरेक्टरेटने 14 कोटींपेक्षा जास्त किंमतीची संपत्ती जप्त केली. चोकसी बराच काळ अँटिगा आणि बार्बुडामध्ये राहत होता. दुसरीकडे, युकेच्या कोर्टाने पीएनबी घोटाळ्यातील फरार डायमंड व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत.
PNB Scam Accused Mehul Choksi Gone missing, antigua police searching For Him Says His Lawyer Vijay Aggarwal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App