विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत झालेली चूक ही अक्षम्य बाब असून त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी देशातील २७ माजी पोलीस महासंचालकांनी राष्ट्र्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत यापूर्वी इतकी गंभीर चूक कधीच झाली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.PM’s security breach unforgivable, 27 former DGPs write letter to President
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना भटिंडा विमानतळावरून फिरोजपूरला हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी आयत्या वेळी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गावर काही शेतकरी आंदोलन करत असल्यामुळ पंतप्रधानांच्या ताफ्याला साधारण 15 ते 20 मिनिटं वाट पाहत थांबावं लागलं होतं.
त्यानंतर सुरक्षेतील त्रुटी लक्षात आल्यामुळं पंतप्रधानांना नियोजित कार्यक्रम रदद् करून दिल्लीला परत यावं लागलं होतं. या प्रकरणात पंजाब राज्य सरकारकडून पंतप्रधानांना सुरक्षा देण्यात कसूर झाल्याचा ठपका केंद्रीय गृहमंत्रालयानं ठेवला होता.
राष्ट्रपतींना पत्र पाठवलेल्यांपैकी 27 जण माजी पोलीस महासंचालक (डीजीपी )आहेत. देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा हा देशाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा असतो. या प्रकार केवळ किरकोळ चूक म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात यावी आणि राष्ट्रपतींनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालावं, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App