आपल्याला मिळणारी मुस्लिमांची एकगठ्ठा मतं हातून निसटल्याचं ममतादीदींच्या लक्षात आले आहे. आदरणीय दीदी… ओ दीदी. सर्व मुस्लिमांनी एकजूट झाले पाहिजे, मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असं तुम्ही अलिकडेच म्हणाल्या होत्या.PM’s attack on Mamata’s politics of Muslim appeasment, if we had spoken about Muslim unity ..
ममतादीदी तुम्ही सतत निवडणूक आयोगावर टीका करत असतात. जे तुम्ही बोलल्या मुस्लिमांच्या एकजुटीबद्दल तेच आम्ही सर्व हिंदूंनी एकजूट व्हावं, असं बोललो असतो तर निवडणूक आयोगाने आम्हाला ८ ते १० नोटीस बजावल्या असत्या, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: आपल्याला मिळणारी मुस्लिमांची एकगठ्ठा मतं हातून निसटल्याचं ममतादीदींच्या लक्षात आले आहे. आदरणीय दीदी… ओ दीदी. सर्व मुस्लिमांनी एकजूट झाले पाहिजे, मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असं तुम्ही अलिकडेच म्हणाल्या होत्या.
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कूचबिहार आणि हावडामध्ये प्रचारसबा घेतल्या. पंतप्रधान मोदींनी या सभांमधून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जे तुम्ही बोलल्या मुस्लिमांच्या एकजुटीबद्दल तेच आम्ही सर्व हिंदूंनी एकजूट व्हावं,
असं बोललो असतो तर एवढचं नव्हे तर देशातील सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि जगभरात लेख लिहून आमच्यावर बोचरी टीका केली गेली असती.याचा अर्थ मुस्लिम मतंही आपल्या हातून निसटल्याची खात्री ममतादीदींना झाली आहे. मुस्लिमांची एकगठ्ठा मतं आपलीच, असं ममता मानत होत्या.
आता मुस्लिमही तुमच्यापासून दूर गेले आहेत. तुम्हाला जाहीरपणे हे सांगावं लागतंय. यामुळे ममतादीदी तुम्ही निवडणूक हरल्या हे स्पष्ट होतेय असेही मोदी यांनी सांगितले.बंगालमध्ये परिवर्तनाचा दावा करताना मोदी म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सिंडिकेट कशी काम करते हे एका टेपमुळे उघड झालं आहे.
हा आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. पश्चिम बंगालला ममता सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मोठा फटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये गुन्हे, लूटमार होत आली. पण आता भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर नागरिकांचं जीवन आणि व्यवहार करणं सहज होईल. आता बंगालमध्ये खरे परिवर्तन घडेल.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App