वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या ऑलिंपिकवीरांचे इमोशनल कनेक्शन तर सर्वश्रूत आहे. सगळे खेळाडू मोदींवर अतिशय प्रेम करतात त्यांच्या प्रोत्साहनाने भारावून जातात याच्या कहाण्या ते खेळाडू स्वतःच सांगतात. पण या खेळाडूंच्याच नव्हे, तर त्यांच्या पालकांशी आणि परदेशी कोचशी देखील मोदींचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. PM narendra modi invites p. v. sindhu`s korean coach park tae sang to visit ayodhya
याचा प्रत्यय पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीय ऑलिंपिंकवीरांना आपल्या ७ लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी जेव्हा आइस्क्रीम पार्टी दिली तेव्हा आला. मोदींनी प्रॉमिस केल्याप्रमाणे भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला आइस्क्रीम खायला घातलेच तिच्या बरोबर सर्व खेळाडूंनाही पार्टी दिली. त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या.
पण एक त्यावेळची घटना काहीशी दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे या खेळाडूंच्या परदेशी कोचशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. विशेषतः सिंधूंच्या कोरियन कोचशी त्यांनी आत्मियतेने संवाद साधला. सिंधूने कोरियन कोच पार्क ते सांग याची जेव्हा पंतप्रधान मोदींशी ओळख करून दिली, तेव्हा मोदींनी पार्कला अयोध्येला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यांनी कोरिया आणि अयोध्या यांच्या ऐतिहासिक संबंधांचाही उल्लेख केला. कोरियाचे अध्यक्षांच्या पत्नीने आपल्या भारत दौऱ्यात अयोध्येला आवर्जून भेट दिली होती, याची आठवण सांगितली. पार्कने अयोध्येला जरूर भेट दिली पाहिजे. अयोध्या आणि कोरिया यांच्या संबंधांचा गौरवपूर्ण इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे मोदींनी पार्कला सांगितले.
This will always be a very special interaction with Hon’ble PM @narendramodi ji for me. As I’m overwhelmed by the support, I was happy to discuss how I can also support badminton in India with him, along with an exceptional team of people 🙏🏽 pic.twitter.com/XBD2evhzXz — Pvsindhu (@Pvsindhu1) August 18, 2021
This will always be a very special interaction with Hon’ble PM @narendramodi ji for me. As I’m overwhelmed by the support, I was happy to discuss how I can also support badminton in India with him, along with an exceptional team of people 🙏🏽 pic.twitter.com/XBD2evhzXz
— Pvsindhu (@Pvsindhu1) August 18, 2021
या वेळी पार्कने मोदींना त्याची पत्नी मोदींची किती मोठी फॅन आहेतिला मोदींना भेटण्याची इच्छा आहे, हे सांगितले. त्यावेळी मोदींनी पुढच्या भारतभेटीत पार्कला पत्नीसह अयोध्येला येण्याचेही निमंत्रण दिले. २००० वर्षांपूर्वी अयोध्येची राजकन्या सुरिरत्ना हिने लांबचा प्रवास करून कोरियाला भेट दिली होती. कोरियाचा राजा आणि सुरिरत्ना हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला होता. यातून दोन्ही देशांमधले रक्ताचे नाते तयार झाले. याची आठवण पंतप्रधान मोदींनी पार्कला आवर्जून सांगितली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App