पंतप्रधान मोदींकडून लालू प्रसाद यांच्या तब्येतीची चौकशी; बिहारचे शिष्टमंडळ चकित

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारमधील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्य विषयावर येण्यापूर्वी शिष्टमंडळातील राजदचे नेते आणि लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे लालू प्रसाद यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यामुळे शिष्टमंडळ चकित झाले. PM Narendra Modi inquired about health of Lalu prasad Yadav in Bihar delegation meeting on caste census

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. परंतु सध्या पँरोलवर आहेत.त्यांना रुदय विकार राणी ह्रदय विकार आणि किडनीचा विकार आहे. “लालू जी कैसे है?” असा प्रश्न विचारला म्हणून पंतप्रधानांनी मिटींगला सुरुवात केली. त्यांनी तेजस्वी यादव यांना लालूप्रसाद यांच्या तब्येती विषयी आणि उपचाराविषयी अनेक प्रश्न विचारले. तेजस्वी यादव यांनी मोदींना सर्व माहिती दिली.



त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री जतिन राम मांझी यांच्याकडे बघून मास्क काढण्यास सांगितले. तुमच्या मास्कच्या मागचे हसू आम्हाला कसे दिसणार?, असा विनोदी सवाल मोदींनी जतिन राम यांना केला. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हलकेच विनोद करत, “मोदीजी तुम्हीच संपूर्ण देशाला “नकाब पोश्त” व्हायला सांगितले आहे, असे म्हटले. त्यावर बैठकीत हशा पिकला.

त्यानंतर शिष्टमंडळाची अधिकृत अजेंड्यावर चर्चा झाली. शिष्टमंडळाने मोदींना देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली, ही बातमी इंडिया टीव्हीने दिली आहे.

PM Narendra Modi inquired about health of Lalu prasad Yadav in Bihar delegation meeting on caste census

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात