या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. PM Modis reaction on the shocking incident of two women in Manipur
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील या घटनेचा संदर्भ देत म्हटले की, ‘’’मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. दोषी किती आणि कोण, ते आपल्या जागेवर आहे. मात्र अशा घाणेरड्या घटनेने संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. या घटनेमुळे 140 कोटी भारतीयांना लाज वाटली. या लाजिरवाण्या घटनेबद्दल माझे हृदय आज वेदना आणि संतापाने भरून आले आहे.’’ अशा शब्दांमधे मोदींनी संताप व्यक्त केला आहे.
याचबरोबर मोदी म्हणाले की, ‘मी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आवाहन करतो. आमच्या माता भगिनींच्या रक्षणासाठी कठोर पावले उचला. भारतात कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्यायला हवे आणि राजकीय वादविवादांवरून उठून माता-भगिनींचा सन्मान करायला हवा. मणिपूरच्या मुलींच्या बाबतीत जे घडले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App