भर पावसात चालत जाऊन मुख्यमंत्र्यांचा इर्शाळवाडीतल्या नागरिकांना आधार!!


प्रतिनिधी

रायगड : इर्शाळवाडी येथील दरड कोसळलेल्या दुर्घटना स्थळाच्या दिशेने चालत असताना वाटेत काही ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले भेटले. त्यांनी काही वेळा तिथे थांबून त्या सर्वांची आस्थेने विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत सरकार तुम्हाला शक्य ती सारी मदत करेल असे आश्वस्त केले. Chief Minister’s support to the citizens of Irshalwadi by walking in full rain!! 

 

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, शक्य तेवढ्या नागरिकांचे जीव वाचविणे याला राज्य सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्रकारांची बोलताना सांगितले.

गावात झालेली दुर्घटना एवढी भीषण आहे की तिथे प्रत्यक्ष वाहन येऊ शकत नाही. त्यामुळे मदतीचा वेग कमी आहे. परंतु मानवी मदत शक्य तेवढी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. जास्तीत जास्त जीव वाचवणे याला सरकारचे प्राधान्य आहे. आत्तापर्यंत मृतांचा आकडा 12 आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Chief Minister’s support to the citizens of Irshalwadi by walking in full rain!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात