नवी दिल्ली – नवरात्राच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. हा दिवस मोदींसाठी खास आहे कारण मोदींनी घटनात्मक पद स्वीकारले त्याला ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होणार आहेत.PM Modi will reach Uttarkhand on & OCT
यादरम्यानच ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकतील .पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. जॉलीग्रांट विमानतळाचे उद्घाटन, ऋषीकेश येथील एम्समध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते केले जाणार असून अन्य विकासकामांचाही ते आढावा घेतील.
मोदींच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण होत असल्याने ते त्या दिवशी केदारनाथाचे दर्शन घेणे स्वाभाविक मानले जाते. मोदी यांची केदारनाथावर अपार श्रध्दा असून त्यांच्यासाठी हे ज्योतिर्लिंग विशेष आहे.
मोदी यांनी ऐंशीच्या दशकात संन्यासाश्रम स्वीकारला होता तेव्हा ते दीड महिना याच परिसरात वास्तव्यास होते. केदारनाथ मंदिराजवळील मंदाकिनी नदीकाठच्या गरुडचट्टी गुहेत या काळात त्यांनी ध्यानधारणा केली होती. तेव्हा ते दररोज केदारनाथाच्या दर्शनासाठी जात असत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App